महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Bandh : इतिहासातील पहिलीच घटना.. ज्यांच्यावर कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी त्यांनीच बंद पुकारला - फडणवीस

उत्तरप्रदेशातील लखीमपूरच्या घटनेच्या निषेधार्थ आज राज्यात महाविकास आघाडीतील पक्षांकडून बंद पुकारण्यात आला आहे. या बंद संदर्भात बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे ढोंगी सरकार आहे. लखीमपूरसाठी बंद केला जातो पण राज्यातल्या शेतकऱ्यांना मदत केली नाही. भारतीय जनता पार्टीचं सरकार बरं होतं असे शेतकरी बोलत आहेत आताचं सरकार हे ढोंगीबाज आहे, असं ते म्हणाले.

By

Published : Oct 11, 2021, 3:10 PM IST

Updated : Oct 11, 2021, 4:26 PM IST

devendra fadnavis
devendra fadnavis

मुंबई -महाविकास आघाडी सरकारने पुकारलेला बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे. या बंदमधून सरकारचा ढोंगीपणा उघड झाला असून हा तर सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. आज पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते.

महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपण समोर आला आहे. हे पूर्णपणे ढोंगी सरकार आहे. लखीमपूरच्या घटनेसाठी महाराष्ट्रात बंद केला जातो. पण महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी हे सरकार एकही पैसा देत नाही. शेतकरी संकटात आहेत. हे सरकार आल्यापासून दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकारने बांधावर जाऊन 25 हजाराच्या घोषणा केल्या, 50 हजाराच्या घोषणा केल्या, पण या सर्व घोषणा हवेत विरल्या. विविध आपत्तीत मदतच केली नाही. केली तरी तोकडी केली. त्यामुळे घटक पक्षच म्हणून लागले भाजपचे सरकार बरं होते. हे सरकार मदत करत नाही. त्यामुळे आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे, अस फडणवीस म्हणाले. तसेच सरकारला थोडीही नैतिकता असेल तर हे सरकार संध्याकाळपर्यंत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस
मावळमध्ये गोळीबार हेच जालियनवाला होते -

याच सरकारने मावळला पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. गोळीबार करणाऱ्यांना आंदोलन करण्याची नैतिकता तरी आहे का? असा सवाल करतानाच मावळमध्ये गोळीबार झाला तो जालियनवाला बाग होता, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. आजचा बंद संवेदना दाखवणारा नाही तर राजकीय पोळी भाजण्यासाठीचा आहे. या बंदला लोकांचा प्रतिसाद नाही. प्रशासनाची मदत घेऊन दमदाटी करून पोलीस, जीएसटी प्रशासनाचा वापर करून लोकांना बंद करायला भाग पाडलं जात आहे, असा दावाही त्यांनी केला. फडणवीस म्हणाले की, ज्यांच्यावर कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असते त्यांनीच मंत्रिमंडळ बैठकीत बंद पुकारण्याचा निर्णय घेतला. मंत्रिमंडळ बैठकीचा असा दुरुपयोग करण्याची स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

हे ही वाचा -'महाराष्ट्र बंद'वर काय म्हणाले संजय राऊत?

हे तर बंद सरकार -

तसंही या सरकारचे नाव बंद सरकार आहे. या सरकारने आल्यापासून योजना, अनुदाने बंद केली. कोरोना काळात महाराष्ट्र बंद केला. आता कुठे छोटे दुकानदार आणि व्यापाऱ्यांचे गाडं रुळावर येत असताना सरकारने बंद पुकारला. ईस्टर्न एक्सप्रेसवर दहा लोकांनी जाळपोळ केली. त्यावेळी पोलीस बघ्याची भूमिका घेत होते. धमक्या देऊन, दमदाटी करून बंद पुकारला जात आहे, असं ते म्हणाले.

हे ही वाचा -MaharashtraBandh : महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून हुतात्मा चौकात निदर्शने



सरकारकडून वसुली करा -

सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई हायकोर्टाने बंद करण्यास मनाई केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने स्यूमोटो घेऊन अवमानना केल्याप्रकरणी यापूर्वी बंद पुकारला म्हणून शिवसेनेला दंड ठोठावला होता. सेनेने त्याची भरपाई भरली होती. त्यामुळे आजच्या बंदमध्ये जे काही नुकसान होईल, त्याची भरपाईही सरकारकडून वसूल केली पाहिजे. कोर्टाने स्यूमोटोद्वारे या घटनेची दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Last Updated : Oct 11, 2021, 4:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details