महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आता नवा वसुली मंत्री कोण? गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ यांचा टोला - चित्रा वाघ

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला. पण आता प्रश्न उरतो की, नवा वसुली मंत्री कोण?, असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

chitra wagh
चित्रा वाघ

By

Published : Apr 5, 2021, 6:44 PM IST

मुंबई - राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला. पण आता प्रश्न उरतो की, नवा वसुली मंत्री कोण?, असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. मंत्रिमंडळातील एखादा चेहरा बदलल्याने महाविकास आघाडी सरकारचा भ्रष्ट हेतू काही बदलणार नाही, अशी टीका देखील चित्रा वाघ यांनी केली आहे.

चित्रा वाघ यांनी केलेले ट्विट

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या वसुलीचा आरोप केला होता. परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने आज सीबीआय चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. देशमुखांच्या राजीनाम्यानंतर आता भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details