मुंबई -सहकार क्षेत्रातील मंजूर संस्थावरून भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. राज्यात 90 टक्के संस्था राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आहेत. मात्र शिवसेनेला त्यातील काही कळत नसल्याने त्यांचा मुद्दाच येत नाही, असा चिमटा काढला आहे. तसेच शिवसेना-भाजप युती तुटावी, यासाठी शरद पवारांनी मिठाचा खडा टाकल्याचा ( Chandrakant Patil On Sharad Pawar ) आरोप पाटील यांनी केला. विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
आमच्यात पवारांनी मिठाचा खडा टाकला -
तत्कालीन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ऊर्जाच्या खात्यातील मागील पाच वर्षांची चौकशीचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी भाजपच्या नेत्यांना अडकवण्याचा घाट सुरू आहेत. विधिमंडळात याबाबत पुरावे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सादर केले होते. ते खरे होताना दिसत आहेत. यंत्रणांचा वापर करून दबाव टाकते, असा आरोप करतात. दरेकर यांचा कोर्टाने जामीन नाकारला आहे. मात्र ज्यांच्यावर गुन्हे सिद्ध झाले तर त्यांचा राजीनामा घ्यायला सरकार तयार नाही. दरेकर, प्रसाद लाड, बावनकुळे यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. परंतु, गुन्हेगारांना पाठीशी घालायचे काम सुरू आहे. तुमच्यावर दाऊदचा दबाव असेल, पण नैतिकता ठेवून तरी खाती काढून घ्याव्यात, अशी मागणी पाटील यांनी केली. तसेच शिवसेना-भाजप युती तुटावी, यासाठी शरद पवारांनी मिठाचा खडा टाकल्याचा ( Chandrakant Patil On Sharad Pawar ) आरोप पाटील यांनी केला.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 90 टक्के मजूर संस्था -