मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढत चाललाय. राज्यातील अनेक नेत्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. शेलार यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे.
भाजप नेते आशिष शेलार यांना कोरोनाची लागण - bjp leader ashish shelar
भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. शेलार यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे.
शेलार यांचे ट्विट
भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करून ही माहिती दिलीय. 'मी कोविड-19 ची तपासणी केली असता, माझी चाचणी पॉझिटिव्ह आलीय. मी औषधोपचार आणि डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. जे कोणी माझ्या संपर्कात आलेले आहेत, त्या सर्वांनी स्वत: ला वेगळे ठेवावे आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मी माझ्या कार्यालयामार्फत मुंबईकरांच्या मदतीसाठी उपलब्ध आहे' असे ट्विट शेलार यांनी केले आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. बुधवारी राज्यात कोरोनाचे ५० हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले. कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक प्रभावी असल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. या दुसऱ्या लाटेत राज्यात एकूण ६,१२,०७० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.