मुंबई- भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांना धमकीचे फोन आले होते. जीवे मारण्याची धमकी त्यांना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात आशिष शेलारांनी पोलिसात तक्रार केली आहे. यासंदर्भात दोन संशयितांना ताब्यात घेतल्याचे शेलार यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
भाजप नेते आशिष शेलार यांना धमकीचे फोन, दोन संशयितांना अटक - भाजप नेते आशिष शेलार बातमी
शेलार यांना सोमवारी 8 ते 10 धमकीचे फोन सतत अनोळखी क्रमांकावरून आले. काल वांद्रे पोलीस ठाण्यात याबाबत शेलारांनी तक्रार दाखल केली. यावरून आज पोलिसांनी मोबाईल क्रमांकाचा शोध घेऊन या प्रकरणी दोघांना मुंब्र्यातून अटक केली आहे.
मुंबई
शेलार यांना सोमवारी 8 ते 10 धमकीचे फोन सतत अनोळखी क्रमांकावरून आले. काल वांद्रे पोलीस ठाण्यात याबाबत शेलारांनी तक्रार दाखल केली. यावरून आज पोलिसांनी मोबाईल क्रमांकाचा शोध घेऊन या प्रकरणी दोघांना मुंब्र्यातून अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास वांद्रे पोलीस करत आहेत, अशी माहिती वांद्रे पोलीस व शेलार यांनी दिली आहे.