मुंबई- मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक 28 सप्टेंबरला पार पडणार आहे. त्याआधी आज एमसीएची सर्वसाधारण सभा आज सायंकाळी पार पडेल. मात्र त्यापूर्वी महाराष्ट्रातल्या बड्या नेत्यांच्या राजकीय गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार हे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी भेटीसाठी ( Ashish Shelar meeting Sharad Pawar ) पोहोचले. एमसीएच्या होणाऱ्या निवडणुकी संदर्भात या बैठकीत चर्चा होत असल्याची माहिती मिळत ( Bjp Leader Ashish Shelar meeting for MCA elections ) आहे.
एमसीएच्या अध्यक्षपदासाठी गाठीभेटीचे सत्रएमसीएच्या या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष आपली ताकद पणाला लावणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीतही भारतीय जनता पक्ष विरोधात शरद पवार आणि आदित्य ठाकरे, असे चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र एमसीएची निवडणूक समन्वयाने पार पाडावी यासाठी आशिष शेलार यांच्याकडून पुढाकार घेतला जात असल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्या गटाकडून क्रिकेटपटू संदीप पाटील यांना पाठिंबा दिला जातोय. तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अमोल काळे यांना पाठिंबा दिला जातोय. त्यामुळे एमसीएच्या अध्यक्षपद नेमकं कोणत्या गटाकडे जाणार याबाबतची चर्चा सुरू आहे. मात्र त्याआधी गाठीभेटीचे सत्र सुरू झाले असून आशिष शेलार ( Bjp Leader Ashish Shelar ) या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी थेट शरद पवार यांच्या घरी दाखल झाले आहेत.