महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

..म्हणून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत प्रवेश घ्या, शेलारांचा अप्रत्यक्षरित्या संजय राऊतांना टोला - आशिष शेलारांची संजय राऊतांवर टीका

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये, संपादक कसे असावे? याचा कोर्स सुरू केला आहे. त्यामुळे ज्यांना आपण संपादक असल्याचा विसर पडला असेल त्यांनी ‌अ‌ॅडमिशन घ्यावे, आशिष शेलार यांची अप्रत्यक्षरित्या संजय राऊतांवर टीका.

Ashish Shelar
आशिष शेलार

By

Published : Jan 9, 2020, 7:54 PM IST

Updated : Jan 9, 2020, 10:40 PM IST

मुंबई - सक्षम विरोधक कसा असावा, याचे प्रशिक्षण रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत देण्याची आवश्यकता असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यावर बोलताना भाजप नेते आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना अप्रत्यक्षरित्या जोरदार टोला लगावला आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांची खासदार संजय राऊत यांच्यावर टीका...

हेही वाचा... कलाकाराचे विचार अमान्य होऊ शकतात; कलाकृतीला मात्र विरोध नको - डॉ. अमोल कोल्हे

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत संपादक कसा असावा याचा कोर्स सुरू....

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये, संपादक कसे असावे? याचा कोर्स सुरू केला आहे. त्यामुळे ज्यांना आपण एखाद्या वृत्तपत्राचे संपादक असल्याचा विसर पडला असेल, त्यांनी येथे ‌अ‌ॅडमिशन घ्यावे. त्यांना विशेष सवलत देऊन शिकवले जाईल, असा टोला आशिष शेलार यांनी अप्रत्यक्षरित्या संजय राऊत यांना लगावला आहे.

हेही वाचा.... गांधी शांती यात्रेला मुंबईतून सुरुवात; सहाहून अधिक राज्यातून जाणार यात्रा

Last Updated : Jan 9, 2020, 10:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details