महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'महाविकास आघाडी सरकारने विवेक बुद्धी गहाण ठेवली काय?' - निवृत्त अधिकारी मदन शर्मा

निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीनंतर भाजपा नेते अशिष शेलारांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

ashish shelar news
'महाविकास आघाडी सरकारने विवेक बुद्धी गहाण ठेवली काय'

By

Published : Sep 15, 2020, 3:35 PM IST

मुंबई - निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीवरून भाजपाने राज्यातील महाविकास आघाडीवर टीकेची झोड उठवली आहे. आज पोलिसांनी शिवसैनिकांवर केलेल्या करवाईवर टीका करत भाजपा नेते आशिष शेलार यांनी 'महाविकास आघाडी सरकारने विवेकबुद्धी गहाण ठेवली आहे का?', असा प्रश्न विचारला. यासंबंधी शेलार यांनी ट्विट केले आहे.

याकूब मेमन आणि मदन शर्मा

मुंबई बॉम्बस्फोट आरोपी याकूब मेमनची कबर वाचवण्यासाठी अजामीनपात्र गंभीर गुन्हा आणि देशप्रेमी निवृत्त नेव्ही अधिकारी मदन शर्मांना मारहाण करणाऱ्यांवर जामीनपात्र साधा गुन्हा वा रे वा! विवेक बुद्धी गहाण ठेवली काय? हे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आहे की, तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी? असा टोला शेलारांनी लगावला आहे.

काय आहे प्रकरण?

निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात एक व्यंगचित्र सोशल मीडियात शेअर केले. त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी मदन शर्मा यांना गाठून मारहाण केली होती. माजी सैनिकाला झालेल्या मारहाणाची हा मुद्दा उचलत विरोधी पक्ष भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती.

त्यानंतर शिवसैनिकांवर गुन्हा दाखल झाला. मात्र, पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेऊन तत्काळ जामिनावर सोडले. भाजपाने यावर आक्षेप घेत राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यात आज शेलार यांनी ट्विट करत वादात उडी घेतली.

ABOUT THE AUTHOR

...view details