मुंबई - मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते. नालेसफाई योग्य प्रकारे होत नसल्याने नाले तुंबतात. यामुळे नालेसफाई योग्य प्रकारे होते आहे का याची पाहणी भाजपाकडून केली जात आहे. भाजपा नालेसफाईची पोलखोल करणार आहेस, असा इशारा भाजपा नेते आशिष शेलार यांनी दिला. तसेच यंदा पाणी तुंबले तर त्याला शिवसेना जबाबदार असेल, असा आरोप आशिष शेलार यांनी केला. मुंबईमधील महामहापालिकेकडून नालेसफाईची कामे केली जात आहे. या नालेसफाईच्या कामाची पाहणी आज भाजपा नेते आशिष शेलार यांनी साऊथ अव्हेन्यू नाला, गझदर बंध, एस.एन.डी.टी. नाला, मोगरा नाला, मेघवाडी नाला, कोलडोंगरी नाला आदी नाल्यांची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.
Nalasafai Issue Mumbai : यंदा मुंबईत पाणी तुंबले तर त्याला शिवसेना जबाबदार - आशिष शेलार - मुंबई नालासफाई
यंदा नालेसफाईचे कॉन्ट्रॅक्ट तीस कोटीने वाढवण्यात आले आहेत. ते कंत्राट उशिरा मंजूर करण्यात आले आहे. यात काही अंडरस्टॅण्डिंग करायची होती म्हणून उशिरा करण्यात आला का? असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला. यंदा पाणी तुंबले तर त्याला शिवसेना जबाबदार असेल, असा इशारा भाजपा नेते आशिष शेलार यांनी दिला.
'अंडरस्टॅण्डिंगसाठी कंत्राट उशिरा मंजूर केले का?' : मुंबईमध्ये महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या नालेसफाईच्या कामावर भाजपा वॉच असणार आहे. त्यासाठी आज ७ एप्रिलपासून १२ एप्रिलपर्यंत नालेसफाईच्या कामाची पाहणी करण्यास सुरुवात करण्यात आली. यंदा नालेसफाईचे कॉन्ट्रॅक्ट तीस कोटीने वाढवण्यात आले आहेत. ते कंत्राट उशिरा मंजूर करण्यात आले आहे. यात काही अंडरस्टॅण्डिंग करायची होती म्हणून उशिरा करण्यात आला का? असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला. यंदा पाणी तुंबले तर त्याला शिवसेना जबाबदार असेल, असा इशारा भाजपा नेते आशिष शेलार यांनी दिला. मुंबई शहरात भाजपा नेते फिरून प्रशासनाकडून नालेसफाई करून घेणार आहेत. नालेसफाईच्या कामाचे फोटो भाजपच्या वॉररुमला पाठवण्याचे आदेश सर्व माजी नगरसेवकांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
माजी नगरसेवकांना 'या' सूचना :नालेसफाई दौऱ्याचे फोटो मुंबई भाजपा वॉर रूमला रोज पाठवायचे आहेत. नाला सफाई पाहणी दौरावरील वेळापत्रकानुसारच आपापल्या विभागातील भाजपाचे वरिष्ठ नेते, खासदार, आमदार व सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन करायचा आहे. दौऱ्यात माजी शिक्षणमंत्री व आमदार आशिष शेलार व माजी गटनेते प्रभाकर शिंदे व पक्षनेते विनोद मिश्रा सहभागी होणार आहेत. यामुळे वेळापत्रकात शक्यतो बदल करू नये. स्थानिक वृत्तपत्रवाहिनीचे प्रतिनिधी, पत्रकार यांना आपण निमंत्रण द्यावे. नाला सफाई पाहणी दौरा करताना एका प्रशासकीय विभागात आवश्यक असेल तेथे गट करावे. तसेच आवश्यकता भासल्यास वरील वेळापत्रकापेक्षा अधिक दिवस लागल्यास तसे नियोजन करावे, असे निर्देश भाजपाकडून माजी नगरसेवकांना देण्यात आले आहेत.
हेही वाचा -ED कारवाईनंतर संजय राऊत मुंबईत दाखल; सेना कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत