मुंबई -भाजप नेते आशिष शेलार यांनी वरळीच्या जांभोरी मैदानात दहीहंडीचे आयोजन केले होते. या उत्सवानंतर जांभोरी मैदानाची पूर्ण दुरव्यावस्था झाली असल्याचा आरोप शिवसेना नेत्यांकडून केला जात आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे, सचिन अहिर, सुनील शिंदे या यांच्याकडून आशिष शेलार व भाजपवर सातत्याने टीका केली जात आहे. या टीकेला आशिष शेलारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी केलं नाही ते आम्ही केलं म्हणून आदित्य ठाकरे यांची कोल्हे कुई सुरू झाल्याचं, आशिष शेलार यांनी म्हटलं ashish shelar criticized aaditya thackeray आहे. ते विधानभवनात बोलत होते.
काय म्हणाले आशिष शेलार? -आशिष शेलार म्हणाले की, दहीहंडी सणावरची मर्यादा काढल्यानंतरच आदित्य ठाकरे यांची कोल्हे कुई सुरू झाली आहे. मला करता आला नाही, ते तुम्ही का केलंत? अशी कोल्हे कुई आदित्य ठाकरे यांच्या शिवसेनेची झाली आहे. शिवाजी पार्कच्या २७ एकर जागेवर आदित्य यांच्याच काळात वाट लावण्यात आली. मैदानावरची माती कुणी खाली. पाणी मारण्यासाठी करोडोचे कंत्राट का दिले व पाणी मारण्याचे पैसे कुठे मुरले?, असा सवालही अशी शेलार यांनी उपस्थित केला आहे.