मुंबई - रेल्वेच्या विशेष गाड्या असतानाही ठाकरे सरकारने आमच्या कोकणातील चाकरमान्यांसाठी सुविधा का उपलब्ध करुन दिली नाही? प्रचंड पाऊस, रस्त्यावरील खड्डे यामुळे चाकरमान्यांचे सरकारने यावेळी हाल का केले? ठाकरे सरकारने कोकणी माणसांवर कुठला आणि कसला राग काढला? असे अनेक प्रश्न विचारत भाजप नेते आशिष शेलारांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
ठाकरे सरकारचा कोकणी माणसांवर कसला राग?
केंद्र सरकारने कोकणातील चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वे गाड्या दिल्या. मात्र, राज्य सरकारने त्या नाकारल्या आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयावरून भाजप नेते आशिष शेलारांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा -राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणावर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीची नियुक्ती होते कशी?
केंद्र सरकारने कोकणातील चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वे गाड्या दिल्या. मात्र, राज्य सरकारने त्या नाकारल्या आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयावरून आशिष शेलार ठाकरे सरकारवर आक्रमक झाले आहेत. रेल्वेच्या विशेष गाड्या तयार असतानाही ठाकरे सरकारने आमच्या कोकणातील चाकरमान्यांसाठी ही सुविधा उपलब्ध का करुन दिली नाही? प्रचंड पाऊस, रस्त्यावरील खड्डे यामुळे चाकरमान्यांचे सरकारने हाल का केले? ठाकरे सरकारने कोकणी माणसांवर कुठला आणि कसला राग काढला? असे प्रश्न त्यांनी ट्विटरवरून ठाकरे सरकारला विचारला आहे.
दरम्यान, राज्य सराकरनेच केंद्राकडे कोकणातील चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वेगाड्याची मागणी केली होती. मात्र, ऐनवेळी राज्याने या गाड्या रद्द केल्याने भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा -ईटीव्ही भारत विशेष: एक शाळा अशीही जिथे मागील ४ वर्षांपासून दिले जातात ऑनलाइन शिक्षणाचे धडे..