मुंबई - शहरात बुधवारी रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. यामुळे रस्ते वाहतूक मंद झाली असून सब वे बंद झाले. यातून सत्ताधाऱ्यांची नियोजन शुन्यता दिसते. महापालिकेच्या नियोजनात कमतरता दिसत आहे. तसेच पूर्व नियोजित व्यवस्था करण्यात महापालिका फेल गेल्याची टीका भाजपचे नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. त्यामुळे या भ्रष्टाचाऱ्यांना सत्तेतून आम्ही बाहेर काढू असा इशाराही शेलार यांनी यावेळी दिला आहे. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला भेट दिल्यानंतर शेलार हे माध्यमांशी बोलत होते.
भ्रष्टाचाऱ्यांना सत्तेतून आम्ही बाहेर काढू -मुंबईमध्ये बुधवारी रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गुरुवारीही मुंबईत जोरदार पाऊस पडत होता. यामुळे सखल भागात पाणी साचले. तर रेलवे वाहतूक ठप्प झाली होती. मिलन सब वे काही वेळासाठी बंद करण्यात आला होता. शुक्रवारी पावसाने उघडीप घेतल्यावर आशिष शेलार यांनी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला भेट दिली. या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना, काल मुंबईत चांगला पाऊस झाला, त्यामुळे संपूर्ण सब-वे बंद झाले, रस्ते वाहतूक मंदावली. यामधून महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची नियोजन शुन्यता दिसते. या आगोदर नियोजन नीट केले असते, तर बरे झाले असते. महापालिकेच्या नियोजनात कमतरता दिसत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. भ्रष्टाचाऱ्यांना सत्तेतून आम्ही बाहेर काढू. आगामी निवडणुकीत आमचा विजय निश्चित असल्याचेही यावेळी शेलार म्हणाले.