महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, म्हणून राष्ट्रवादी पक्ष निवडला - अनिल गोटे - अनिल गोटे यांनी भाजप पक्ष सोडला

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कायम खोटे बोलत राहिले, म्हणून मी भाजप सोडून आज राष्ट्रवादीत आलोय. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा म्हणून मी राष्ट्रवादी पक्ष निवडला असल्याचे अनिल गोटे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले.

Anil Gote
अनिल गोटे

By

Published : Dec 12, 2019, 4:40 PM IST

मुंबई -भाजपमध्ये माझी फसवणूक झाली. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कायम खोटे बोलत राहिले, म्हणून मी भाजप सोडून आज राष्ट्रवादीत आलोय. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा म्हणून मी राष्ट्रवादी पक्ष निवडला असल्याची माहिती भाजपचे माजी ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करताना दिली.

अनिल गोटे यांची प्रतिक्रीया....

हेही वाचा.... ‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार 16 वर्षीय ग्रेटा थनबर्गला जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या उपस्थितीत अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या संपर्कात भाजपचे डझनभराहून अधिक आमदार असल्याचा खळबळजनक दावा केला. तसेच हे आमदार कधीही फुटतील असेही सांगितले.

हेही वाचा... मेळाव्याआधी चंद्रकांत पाटलांची पंकजा मुंडेंबरोबर चर्चा

गोटे म्हणाले की, '8 मे 2019 रोजी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून मी ठरवले होते, आपण वेगळे काही तरी करायचे. त्याच दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी बोलणे झाले होते. त्यांच्याकडे मी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आम्ही जुने मित्र असल्याने त्यांनी त्याचे स्वागत केले.

भाजपमध्ये माझ्यावर अन्याय करणारा पैदा झालेला नाही. परंतु, त्यांनी मला फसवले, इतके खोटे बोलणारा फडणवीससारखा मुख्यमंत्री मी कधीही पाहिला नाही. अशासारख्या माणसाने खोटे बोलणे योग्य नव्हते. माझ्यावर झालेल्या फसवणुकीसाठी मी तीन पत्र लिहिली, परंतु त्यांनी मला उत्तर दिले नाही. कारण त्यांच्याकडे उत्तरच नव्हते. मी त्या पत्रात लिहिलेला एक शब्द जरी खोटा असला, तरी मी राजकारण सोडून देईन. कारण माझी पार्श्वभूमी ही संघ, जनसंघ अशी होती. परंतु, माझी महापालिका निवडणुकीत फसवणूक केली. इतकेच नाही तर फडणवीस यांनी सर्वांचीच फसवणूक केली. धनगर समाजाला राजकारणातून मुळातून उखडून टाकले.' असे अनिल गोटे यावेळी म्हणाले. तसेच आपल्यासोबत डझनभराहून अधिक आमदार असल्याचा दावाही त्यांनी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details