मुंबई -महानगरपालिकेकडून कोरोनाच्या नावाखाली मास्क, डेड बॉडी बॅग आदींच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी त्रिसदस्यिय न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली करावी, अशी मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे. भ्रष्टाचार लपवण्यासाठी गेल्या 3 महिन्यांत पालिकेच्या स्थायी समिती, गटनेता बैठक तसेच सभागृह आयोजित करण्यात आले नसल्याचे शिंदे म्हणाले.
कोरोनाकाळात पालिकेने केलेल्या खरेदीची न्यायालयीन चौकशी करावी - भाजपची मागणी - corruption in BMC
महानगरपालिकेकडून कोरोनाच्या नावाखाली मास्क, डेड बॉडी बॅग आदींच्या खरेदीत खरेदीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी त्रिसदस्यिय न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.
मुंबई महानगरपालिकेकडून कोरोनाच्या परिस्थितीत मास्क, पीपीई किट तसेच डेड बॉडी बॅग आदी वस्तू खरेदी करण्यात आल्या आहेत. या खरेदीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्याचा आरो त्यांनी केलाय. पालिका आयुक्तांना पत्र देऊन देखील लक्ष दिले जात नसल्याने भाजपाच्यावतीने महापौर कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना शिंदे यांनी या भ्रष्टाचाराची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
परेल येथील हाफकीन इन्स्टिट्यूट 4.75 रुपयाला मास्क खरेदी करते. तेच मास्क पालिका 11.85 रुपयांना खरेदी करते. कोरोनाचे डेड बॉडी बॅग मार्केटमध्ये 500 ते 800 रुपयांना घेते त्याच बॅग पालिका 6700 रुपयांना खरेदी करते. या बॅगसाठी 10 निविदा आल्या होत्या. मात्र, त्यापैकी 9 जण बाद झाले. ज्याच्यावर राजकोय वरदहस्त होता त्याला हे बॅग पुरवठ्याचे काम देण्यात आले. याबाबत पालिका आयुक्तांना पत्र दिले. मात्र त्यांनी उत्तर दिलेले नाही. यामुळे आम्हाला हे आंदोलन करावे लागत असल्याचे शिंदेंनी सांगितले. या खरेदी मागे कोणता अधिकारी आहे, त्यांची चौकशी करावी अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.
पालिका प्रशासनाकडून सुरू असलेला घोटाळा उघड होऊ नये म्हणून सत्ताधारी त्यांना साथ देत आहेत. यामुळे पालिका सभागृह, स्थायी सभा, गट नेता सभा गेल्या 3 महिन्यांत घेण्यात आलेल्या नाहीत. सभा घेतल्यास भाजपा हे घोटाळे बाहेर काढण्याच्या भीतीने सभा घेतल्या जात नसल्याचा आरोप शिंदे यांनी यावेळी केला. पालिकेच्या सभा घेतल्या जात नसल्याने लोकशाहीची मुस्कटदाबी सुरू असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला. पालिकेत मेलेल्या मृत्युच्या टाळूवरील लोणी खाण्याचे काम सुरू आहे. भ्रष्टाचार लपवण्यासाठीच सभा बंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.