महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भाजप मोर्चांला घाबरत नाही, पण मोर्चा आला तर ते मला मारतील - जितेंद्र आव्हाड - if Morcha comes, they will kill me

आरक्षणाच्या मुद्द्यावर (OBC reservation issue) ओबीसींवर केलेल्या विधानामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP leader Jitendra Awhad) वादात सापडले आहेत. भाजपने यावर आक्रमक पवित्रा घेत मोर्चा काढू असा इशारा दिला. भाजपची नितीच 'मुंह में राम बगल मे छुरी', आहे असा पलटवार आव्हाड यांनी केला. तसेच भाजपच्या मोर्चांना घाबरत नाही. परंतु, मोर्चा आला तर लफडा होईल, मला मारतील, (if Morcha comes, they will kill me) असे सांगत भाजपच्या मोर्चाची टर उडवली.

jitendra avhad_
जितेंद्र आव्हाड

By

Published : Jan 5, 2022, 4:19 PM IST

मुंबई - ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने ठाण्यातील कर्तबगार महिलांचा सन्मान कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना ओबीसींवर विश्वास नाही, असे विधान केले. यावर विरोधकांनी रान उठवले असून आव्हाडांनी माफी मागावी अशी मागणी लावून धरली. तसेच आव्हाड यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला. आव्हाड यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकारणीची बैठक संपल्यावर भाष्य केले.

मी कधीच बेसावध राहत नाही
राजकारणात मोर्चे, प्रतिमोर्चे येत असतात. मी देखील असे मोर्चे काढले आहेत. मी कधीच बेसावध राहत नाही. जे बोलतो, ते मनातून बोलतो. भाजप सारखे 'मुंह में राम, बगल में छुरी अस नाही'. खरा मोर्चा काढण्याची वेळ होती. तेव्हा भाजपवाले यात्रेत होते. मी अशा मोर्चांना घाबरत नाही, असा इशारा आव्हाड यांनी भाजपला दिला. तसेच मोर्चा आला तर मला मारतील, लफड होईल त्यामुळे सकाळी नऊ वाजताच घर सोडल्याचे आव्हाड यांनी सांगताच एकच हशा पिकला. कार्यकर्त्यांनी घराला सुरक्षा कवच दिले आहे. कार्यकर्त्यांचे अपार प्रेम माझ्यावर असल्यानेच ते घराबाहेर कडा पाहरा देत असल्याचे आव्हाड म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details