मुंबई -बलात्काराच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंविरोधात भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपच्या महिला मोर्चाकडून मुंबईत धनंजय मुंडेंविरोधात आंदोलन करण्यात आले. मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली.
हेही वाचा -कोणीही आरोप करावा आणि त्यावर निर्णय घ्यावा, अशी परिस्थिती नाही - शरद पवार
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी
भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली महिला मोर्चाकडून आंदोलन करण्यात आले. सामाजिक न्याय या सारखे खाते सांभाळणाऱ्या व्यक्तीवर एका महिलेकडून झालेले आरोप पाहता धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. एखाद्या महिलेने कॅबिनेट मंत्र्यावर आरोप करणे हे गंभीर आणि धक्कादायक आहे. राजकीय दबावाला बळी न पडता पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कोणत्याही दबावाला बळी न पडता तपास केला पाहिजे. मुलीनं केलेल्या आरोपामध्ये काही जर तथ्य असेल आणि धनंजय मुंडे दोषी आढळले तर नियमाप्रमाणं शिक्षा व्हावी, असंही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -'तक्रार दाखल करून घेतली नाही तर सोमवारी रेणू शर्मा जाणार न्यायालयात'