मुंबई : भाजपची आरक्षणाविरोधात वेगळी विचारधारा आहे. एक वेगळा दुतोंडी चेहरा असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. जेव्हा कधी आरक्षणाचा विषय येतो तेव्हा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्याचा विरोध करत राहतात. काही संघटना पुढे आणतात आणि आंदोलने करतात असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.
भाजपची आरक्षणाबाबत वेगळी विचारधारा, नवाब मलिकांची टीका - भाजप
सात वर्षांत महागाई कमी झाली नाही. पेट्रोलचे दर कमी झाले नाहीत. लोकांच्या खात्यात १५ लाख आले नाहीत. दरवर्षी २ कोटी लोकांना रोजगार देण्याचे जाहीर केले, त्यापैकी कुणालाच रोजगार मिळाला नाही. जी स्वप्ने मोदींनी दाखवली त्यातील एकही पूर्ण केले नाही, अशी टीकाही नवाब मलिक यांनी मोदींच्या सात वर्षांच्या कार्यकाळावर केली आहे.

भाजपची आरक्षणाबाबत वेगळी विचारधारा
भाजपची आरक्षणाबाबत वेगळी विचारधारा
अनेकांचा रोजगार गेला
कोट्यवधी लोक रोजगाराला मुकले. कित्येक लोकांना अर्ध्या पगारावर काम करावे लागले. अर्थव्यवस्था अक्षरशः चौपट आहे. यापेक्षा मोदी सरकारची नाकामी असूच शकत नाही अशा शब्दांत नवाब मलिक यांनी हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा -'सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास करून अतिरिक्त ओबीसी आरक्षणाबाबत प्रक्रिया पूर्ण करू'
Last Updated : May 31, 2021, 3:55 PM IST