महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मंत्री नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा,भाजपाचे राज्यपालांना पत्र

मंत्री नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी भाजपने राज्यपालांकडे पत्र द्वारे केली आहे. यासंदर्भात भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी राज्यापालांकडे निवेदनही दिले आहे.

मुंबई
मुंबई

By

Published : Apr 19, 2021, 9:39 PM IST

मुंबई -राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी राज्यापालांकडे निवेदनही दिले आहे.

खोटा आरोप करून केंद्र सरकारबद्दल असंतोष निर्माण केल्याबद्दल आणि अफवा पसरविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली.

केंद्र सरकारने महाराष्ट्राला होणारा रेमडेसिवरचा पुरवठा करण्यास कंपन्यांना मनाई केली, असा खोडसाळ आणि असत्य आरोप नवाब मलिक यांनी ट्वीट करून केला. या त्यांच्या आरोपाच्या समर्थनार्थ एकही पुरावा त्यांनी आतापर्यंत दिलेला नाही. नवाब मलिक यांनी केंद्र सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण केला, राज्याचा मंत्री असूनही केंद्राच्या विरोधात असंतोष निर्माण करून घटनात्मक चौकटीला नुकसान पोहचवले, कोरोनाच्या महासाथीत अफवा पसरवली तसेच जनतेत भीती निर्माण केली. त्यांच्या या अपराधाबद्दल राज्य सरकारचे घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालांनी नवाब मलिक यांची सरकारमधून हकालपट्टी करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. त्यांविरोधात पोलिसात गुन्हा नोंदवून कायद्याच्या योग्य कलमांनुसार शिक्षा घडवावी, असेही ते म्हणाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details