मुंबई - मुलुंडच्या आनंद नगर टोल नाक्यावर भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केला. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी पूर्व द्रुतगती मार्गावर उतरून वाहतूक थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेतले. या वेळी महिलांनी उद्धव ठाकरे सरकार विरोधात घोषणाबाजी केली. संजय राठोड यांचा राजीनामा घ्या आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी यावेळी केली. जर वन मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नाही असा इशाराही भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी दिला.
संजय राठोड यांचा राजीनामा घ्या, अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही भाजपचा इशारा - मुंबई भाजपा बद्दल बातमी
संजय राठोड यांचा राजीनामा घ्या अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही असा इशार भाजपाने दिला आहे. यावेळी संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात आली.
शिवसेनेवर दबाव निर्माण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पुर्ण जोर लावलेला दिसत आहे. भारतीय जनता पक्षातर्फे आज राज्यभर जोरदार आंदोलन करण्यात आले. संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
आज आनंद नगर टोल नाका येथे भारतीय जनता पक्षातर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीने जोरदार घोषणाबाजी करत रस्ता जाम करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची देखील झाली. आगाऊ सूचना देऊन सुद्धा भारतीय जनता पक्षाने आंदोलन केल्यामुळे आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहोत असे मुलुंड पोलिसांनी सांगितले.