मुंबई - भाजपची युती तुटल्यानंतर मुंबई महापालिकेत भाजपने विरोधीपक्षात बसण्याचा निर्णय घेतला आहे. २०२२ च्या महापालिका निवडणुकीत भाजपचा महापौर बसवण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. त्यासाठी महापालिकेत काही बदल करण्यात आले आहेत. स्वीकृत नगरसेवक असलेल्या गणेश खणकर यांच्या जागी भालचंद्र शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर भाजपा आक्रमक भूमिका घेणार असल्याचे गणेश खणकर यांनी म्हटले आहे. आक्रमक भूमिका शिवसेनाच घेवू शकते. भाजपला धोबीपछाड शिवसेनाच देऊ शकते असा टोला स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी लगावला आहे.
मुंबई महापालिकेत २५ वर्षांहून अधिक काळ शिवसेना आणि भाजपची युती होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती तुटली. शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांबरोबर जात महाविकास आघाडी स्थापन करून सरकार स्थापन केले. यानंतर भाजप सत्तेत येणार नाही हे स्पष्ट झाल्यावर भाजपने विरोध पक्षात बसणे पसंद केले आहे. राज्याप्रमाणेच मुंबई महापालिकेतही भाजपने विरोधी पक्षात बसणे पसंद केले आहे. त्यासाठी भाजपने गटनेते पदासाठी विनोद मिश्रा यांची तर विरोधी पक्ष नेते पदासाठी प्रभाकर शिंदे यांची नावे जाहीर करत विरोधी पक्षाने नेते पदावर दावा दाखल केला आहे. गटनेते आणि विरोधी पक्ष नेते पदासाठी उमेदवारी जाहीर करून भाजप गप्प बसललेला नाही. आज भाजपाकडून आपले स्वीकृत सदस्य असलेले गणेश खणकर यांचा राजीनामा घेतला असून त्यांच्या जागी प्रवक्ते असलेले भालचंद्र शिरसाट यांची नियुक्ती केली आहे. भालचंद्र शिरसाट हे अभ्यासू नेते म्हणून परिचित आहेत. यामुळे येत्या २०२२ च्या पालिका निवडणुका डोळ्या समोर घेऊन असे बदल केले गेले आहेत.
भाजप आक्रमक भूमिका घेणार -