मुंबई : मुंबई महानगरपालिकेत शिवसेना सत्तेत तर भाजप विरोधी पक्षात होता. राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचे सरकार गेले. शिवसेनेत बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे व भाजपचे सरकार आले. त्यानंतर पालिकेमध्ये ( BJP Strength Increased in BMC ) भाजप आक्रमक ( BJP is aggressive in BMC ) झाली आहे. मागील सत्ताधाऱ्यांनी आणि पालिका प्रशासनाने घेतलेले निर्णय मागे घेण्यास ( Shiv Sena Decision Started to Reversed ) आयुक्तांना भाग पाडले आहे. आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांचेही अनेक प्रकल्प हे भाजपच्या रडारवर आले आहेत. यावर मुंबईकरांच्या प्रश्नांवर आक्रमक असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. तर निवडणुकीत मतदार जो काय तो निर्णय घेतील, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेत सत्ता काबीज करण्याचे लक्ष्य : मुंबई महापालिकेत गेले २५ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. ही सत्ता काबीज करण्यासाठी भाजपाने मिशन १३४ जाहीर केले आहे. राज्यात सत्ता परिवर्तन होताच भाजपा कामाला लागली आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात घुसून कोणत्याही परिस्थितीत भाजपाचा नगरसेवक निवडून आणा, असे आदेश माजी नगरसेवकांना देण्यात आले आहेत.
पालिकेवर शिवसेनेची २५ वर्षे सत्ता : मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होणार होती. मात्र कोरोना मुळे निवडणुकीला उशीर झाला आहे. या निवडणुका ऑक्टोबर मध्ये होण्याची शक्यता आहे. पालिकेत गेले २५ वर्षांहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. या काळात भाजपा शिवसेनेचा मित्र पक्ष राहिला आहे. २०१४ च्या निवडणुकीत केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आल्यावर २०१७ ची पालिका निवडणुक शिवसेना आणि भाजपा वेगवेगळे लढले. भाजपाचे ८२ तर शिवसेनेचे ८४ नगरसेवक निवडून आले. तेव्हापासून पालिकेवर भाजपाचा महापौर बसवण्याचा संकल्प भाजपाने केला आहे.
भाजपचे मिशन १३४ :मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर बसवण्यासाठी मिशन १३४ जाहीर करण्यात आले आहे. पालिकेच्या २३६ पैकी १३४ जागा निवडून आणण्याचा संकल्प भाजपाने केला आहे. मुंबई महापालिकेला १३४ वर्षे पूर्ण होत असल्याने हा संकल्प करण्यात आला आहे. महापालिकेत या संदर्भात सोमवारी भाजपाच्या माजी नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत भाजप आमदार मिहिर कोटेचा, भाजप प्रवक्ते भालचंद्र शिरसाट, माजी नगरसेवक व गटनेते प्रभाकर शिंदे, माजी नगरसेवक व पक्षनेते विनोद मिश्रा आदींनी मार्गदर्शन केले.
पाणी कपात रद्द : मुंबईमध्ये जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडला नव्हता. पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये १० टक्के पाणी शिल्लक असल्याने पालिकेने २७ जूनपासून १० टक्के पाणी कपात लागू केली. २९ जूनपासून पावसाला सुरुवात झाली. आठच दिवसांत पाणीसाठा वाढू लागला. भाजपच्या माजी नगरसेवकांचे शिष्टमंडळ पालिका आयुक्तांना भेटले. पाणी कपात रद्द करण्याची मागणी केली. धरणात ५० टक्क्यांहून अधिक साठा जमा झाल्यावर पाणी कपात रद्द केली जाते. मात्र, आयुक्तांनी २५ टक्के पाणीसाठा असतानाच कपात रद्द केली आहे.
पोयसरनदीचे पाणी इमारतीमध्ये : पोयसर नदी येथे संरक्षण भिंत बांधल्याने बाजूला असलेल्या जीवन विद्या मिशन मार्गावरील हौसिंग सोसायटीमध्ये ३ ते ४ फूट पाणी शिरले होते. मुंबई महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार करूनही याची गंभीर नोंद घेतली जात नव्हती. त्यासाठी भाजपचे चारकोप कांदिवलीचे आमदार योगेश सागर यांनी पालिका आयुक्तांच्या बंगल्यावर आंदोलन करण्याचा तसेच न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. याची दखल पालिका आयुक्तांनी घेऊन त्वरित अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांना पाठवून समस्या काय आहे जाणून घेतले.