मुंबई -भाजपमधील नाराज नेत्या पंकजा मुंडे व माजी मंत्री विनोद तावडे यांना भाजपने अखेर राष्ट्रीय स्तरावर संधी दिली आहे. या दोघांचीही भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदी वर्णी लागली आहे. भाजपचे दुसरे नाराज नेते एकनाथ खडसे यांना मात्र यात स्थान मिळालेले नाही.
भाजपकडून पंकजा मुंडेंसह विनोद तावडेंना राष्ट्रीय पातळीवर संधी - पकंजा मुंडे भाजप राष्ट्रीय कार्यकरणी बातमी
भाजपमधील नाराज नेत्या पंकजा मुंडे व माजी मंत्री विनोद तावडे यांना भाजपने अखेर राष्ट्रीय स्तरावर संधी दिली आहे. या दोघांचीही भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदी वर्णी लागली आहे. भाजपचे दुसरे नाराज नेते एकनाथ खडसे यांना मात्र यात स्थान मिळालेले नाही.
भाजपकडून पंकजा मुंडेंसह विनोद तावडे यांना राष्ट्रीय स्तरावर संधी
पंकजा मुंडे केंद्रात जाण्यास उत्सुक नसल्याचे चित्र, समर्थक ही नाराज
भाजपने 4 जुलैला नवी कार्यकारणी जाहीर केली आहे. यात पंकजा मुंडे यांची विशेष निमंत्रित म्हणून बोळवण करण्यात आली आहे. दरम्यान, नव्या पक्ष कार्यकारिणीचे पंकजा यांनी ट्विट करून अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या बद्दल पक्षाने भूमिका जाहीर केली, याबाबत त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले आहेत. या ट्विट मधूनच पंकजा यांच्या नाराजीचा सूर स्पष्ट दिसून येत आहे.
Last Updated : Sep 26, 2020, 5:32 PM IST