मुंबई - शहरातील कोरोनाचा विळखा वाढत असताना धारावी, वरळी आणि भायखळा या भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात 'पॉझिटिव्ह' झाले आहेत. यातच आता गोवंडीत देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याने आणखी चिंतेत भर पडलीय. मात्र, अद्याप या परिसरातील लोकांची गर्दी कमी होत नाही. तसेच नागरिक कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सचे नियम पाळत नाहीत. यावर किरीट सोमय्या यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्यशासन आणि महापालिका प्रशासनातील अधिकारी हा प्रकार खपवून घेत असल्याचा टोला त्यांनी लगावलाय.
दिवसेंदिवस महानगर परिसरातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. मात्र, लोकांची गर्दी काही कमी होत नसल्याने महामारी वाढण्याचा धोका वर्तवण्यात येतोय. लोकांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. मात्र, प्रशासकीय अधिकारी याकडे गंभीरतेने पाहात नसल्याचे ते म्हणाले.