मुंबई हर घर तिरंगा अभियान Har Ghar Tiranga Initiative Mumbai देशभरात राबवले जात आहे. ठिकठिकाणी तिरंगा लावण्यात येत आहेत. नरिमन पॉईंट ते गिरगाव चौपाटीपर्यंत Nariman Point to Girgaon Chowpatty लावलेल्या तिरंग्याच्यामध्ये भाजपचा झेंडा लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. देशप्रेमींमध्ये यामुळे संतापाची लाट आहे. यंदा देशाचा अमृत महोत्सव वर्ष साजरे करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांनी हर घर तिरंगा अभियान राबवण्याचे आवाहन केले आहे. शिंदे सरकारनेसुद्धा महोत्सवी Azadi ka Amrit Mahotsav वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रत्येक घरात झेंडा मोफतची मोहीम महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद आदी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत प्रत्येक घरात झेंडा मोफत देण्याचे आदेश दिले आहेत. सलग आठ दिवस तिरंगा फडकवत ठेवला जात आहे. राज्यातील सर्व महापालिकांना हर घर तिरंगा मोहीम राबविणयाचे आदेश देण्यात आले आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरे करण्यासाठी देशभरातील सर्वच महापालिकां सज्ज आहेत. महाराष्ट्रातसुद्धा हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे. असे असताना हा विचित्र प्रकार निदर्शनास आला.
देशप्रेमींमध्ये संतापाची लाटनरिमन पॉईंट ते गिरगाव चौपाटी भाग नेहमीच वर्दळीचा असतो. मान्सूनमध्ये पहिल्या पावसाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक या परिसराला भेट देतात. गणेशोत्सव काळात मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागचा राजा, गणेश गल्ली आदी दक्षिण आणि मध्य मुंबईतील गणेशमूर्तींचे गिरगाव चौपाटी येथे विसर्जन होते. देशासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पर्यटकांना हा परिसर नेहमीच भुरळ घालतो. या मार्गावर मोठ्या प्रमाणात तिरंगा झेंडे लावण्यात आले आहेत. किमान २ ते ३ तिरंगा झेंड्यांच्यामध्ये भाजपचा झेंडा लावण्यात आला आहे. देशाचा अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत असताना भाजपचे झेंडे तिरंग्याच्यामध्ये लावण्यात आल्याने देशप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.