महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Devendra Fadnavis on Thackeray: बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवले, असे तुमचे म्हणणे आहे का ? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल - Fadanvis on Uddhav Thackeray

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील शिवसैनिकांशी रविवारी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपावर निशाणा साधत काळजीवाहू विरोधक पूर्वी मित्र होते ही खंत आहे कारण आपणच त्यांना पोसले. आपली २५ वर्षे युतीमध्ये सडली. यांना राजकारणाचे गजकर्ण झाले आहे अशी टीका केली. दरम्यान त्यांच्या या टीकेला विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

devendra-fadanvis-
devendra-fadanvis-

By

Published : Jan 24, 2022, 3:29 PM IST

Updated : Jan 24, 2022, 3:49 PM IST

मुंबई -शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी दृकश्राव्य माध्यमाद्वारे राज्यभरातील शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. युतीत आपली २५ वर्षे युतीत सडली. तीच माझी भूमिका आणि मत आजही कायम आहे. मी त्या मतावर ठाम आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. यावर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis on Uddhav Thackeray ) यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेवर पलटवार केला आहे.

तुम्ही बाळासाहेबांच्या निर्णयावर बोट ठेवताय काय -

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सुमारे २०१२ पर्यंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे युतीचे नेते होते. त्यांच्या युतीच्या निर्णयावर तुम्ही बोट ठेवताय का, बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवले, असे तुमचे म्हणणे आहे का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. काल आम्ही बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी ट्वीट केलं, मात्र सत्तेसाठी ज्या काँग्रेसशी हातमिळवणी केली, त्याच्या गांधी कुटुंबीयांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी एक ट्विट तरी केले का, याला लाचारी म्हणतात, असं फडणवीस म्हणाले.

पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस

राम जन्मभूमीच्या आंदोलनात लाठ्या काठ्या आम्ही खाल्ल्या -

फडणवीस म्हणाले की, राम जन्मभूमीच्या आंदोलनात लाठ्या काठ्या खाणारे आम्ही होतो तुम्ही तोंडाच्या वाफा घालवत आहेत. राम मंदिर मोदींनी करून दाखवले. त्यांच्या नेतृत्वात राममंदिराचे निर्माणकार्य सुरू झाले आहे. तुम्ही दुर्गाडी व मलंगगडचा प्रश्न तरी सोडवा. तुमचं हिंदुत्व हे भाषणातलं कागदावरचं आहे. औरंगाबाद, उस्मानाबादचं नाव बदललं नाही, प्रयागराज नाव बदलून दाखवलं असं ते म्हणाले.

युती सोडल्यावर शिवसेना चौथ्या क्रमांकावर -

भाजपसोबत लढलो असे सांगताना हे भाजपसोबत असताना पहिल्या क्रमांकावर गेले. भाजपला सोडल्यावर चौथ्या क्रमांकावर गेले याचा निर्णयही त्यांनी केला पाहिजे. कुणाकडे सडले. हे पाहावे. तेच तेच मुद्दे असतात. कदाचित शिवसैनिकांनाही तेच तेच भाषण पाठ झाले आहे.दरम्यान, रामजन्मभूमी आंदोलनावेळी शिवसेनेची लाट होती. ठरवले असते तर देशात आज शिवसेनेचा पंतप्रधान झाला असता, या दाव्यावर बोलताना, १९९३ मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक झाली. त्यावेळी शिवसेनेने १८० उमेदवार दिले होते. त्यापैकी १७९ जणांचे डिपॉझिट जप्त झाले. त्यानंतरच्या निवडणुकीत सेनेने २४ उमेदवार दिले. त्यापैकी २३ जणांचे डिपॉझिट जप्त झाले होते, अशी आकडेवारीच फडणवीसांनी यावेळी मांडली.

बाळासाहेबांच्या निर्णयावर शंका घेता? -
देवेंद्र फडणवीस म्हणाले सोयीचा इतिहास मांडणे आणि सोयीस्कर विसर या दोन बाबी उद्धव ठाकरे यांच्या भाषणात पाहायला मिळाल्या. भाजपा-शिवसेना युतीचा निर्णय हा वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत 2012 पर्यंत ते युतीचे नेते होते. तेव्हा जर युती मध्ये तुम्ही सोडत होता तर बाळासाहेब ठाकरे यांनी तुम्हाला सडत ठेवले होते का? त्यांनी घेतलेल्या निर्णयावर तुम्ही बोट ठेवत आहात का अशी शंका उपस्थित होते असे सांगत त्यांच्या निर्णयावर प्रश्न विचारून त्यांच्या जयंतीला अपमान का करता. असा सवालही देवेंद्र फडणीस यांनी याप्रसंगी उपस्थित केला.

मुंबईत पहिला नगरसेवक हा भाजपचा, शिवसेनेचा नाही -
विधानसभेची पहिली निवडणूक शिवसेनेने लढविली, ती भाजपाच्या चिन्हावर. 1984 साली लोकसभेची पहिली निवडणूक भाजपच्या चिन्हावर शिवसेना लढली. मनोहरपंत जोशी जे मुख्यमंत्री झाली ते भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढले होते असं सांगत तुमचा पक्ष जन्माला यायच्या अगोदर आमचे नगरसेवक, आमदार होते असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. उगाच मोठ्या मोठ्या कशाला बाता मारता असे सांगत तुमचे हिंदुत्व कागदावरचे आहे. हिंदुत्व बोलून चालत नाही, ते जगावे लागते.राम मंदिर, काशी विश्वनाथ, 370 असे निर्णय घेतले कुणी घेतले तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी घेतले आहेत. तुमची तर संदिग्ध भूमिका होती 370 वर. १९९३ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेने १८० उमेदवार उभे केले, १७९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. १९९६ साली २४ पैकी २३ जागी डिपॉझिट जप्त झाले. २००२ सालच्या निवडणुकीत ३९ पैकी ३९ जागी शिवसेनेचे डिपॉझिट जप्त झाले होते. म्हणे त्यावेळी लाट होती, कशाला खोटे बोलता?

हे ही वाचा -CM Uddhav Thackeray : 'ते दिवस आठवा ज्यावेळी भाजपचं डिपॉझिट जप्त होत होतं' : उद्धव ठाकरेंचा जोरदार पलटवार

आज चौथ्या क्रमांकावर, कुणासोबत युतीत सडले, हे दिसतेच आहे -
शिवसेना जोवर आमच्यासोबत होती, तोवर पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर होती. पण आज चौथ्या क्रमांकावर गेली आहे. चौथ्या क्रमांकावर आल्याचा राग भाजपवर कशाला काढता? चौथ्या क्रमांकावर कोणामुळे गेली याचा शिवसेनेने विचार करावा असे सांगत ना औरंगाबादचे- संभाजीनगर झाले ना उस्मानाबादचे- धाराशिव असा खोचक टोलाही देवेंद्र फडवणीस यांनी लगावला आहे. साधा मलंगगडचा प्रश्न यांच्याने सुटत नाही आणि हिंदुत्वाच्या गप्पा करतात. महाराष्ट्राच्या प्रश्नावर एकदा तरी बोला असेही फडणवीस म्हणाले.

सत्तेचा दुरुपयोग तुम्ही करत आहात -
चोऱ्या कराल तर ED, CBI कारवाई करणारच. तुम्ही तर आमच्या एका कार्यकर्त्यांकडे २५ पोलिस पाठविता.सत्ता आणि पैशाचा दुरुपयोग जितका महाराष्ट्रात झाला, मला काळजी वाटते, महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या थराला चालले आहे. असेही देवेंद्र फडवणीस म्हणाले. एकंदरीत देवेंद्र फडवणीस यांनी मुख्यमंत्री यांनी केलेल्या वक्तव्याचा भरपूर समाचार घेत चहुबाजूने शिवसेनेवर टीका केली आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे -
शस्त्रक्रियेनंतर गेले दोन महिने विश्रांती घेणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीविषयी विरोधकांनी उलटसुलट चर्चा सुरू केली होती. त्याचा उद्धव ठाकरे यांनी काल समाचार घेतला. ते म्हणाले मधले दोन महिने उपचारात गेले असले तरी मी लवकरात लवकर बाहेर पडणार असून महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. जसे काळजीवाहू सरकार असते तसे हे काळजीवाहू विरोधक आहेत. स्वतःच स्वतःच्या काळजीने त्यांचा अंत होणार आहे. हे काळजीवाहू विरोधक एकेकाळी मित्र होते. आपण त्यांना पोसले. २५ वर्षे आपली युतीत सडली, या मतावर मी ठाम आहे. याचे कारण राजकारण म्हणजे गचकरण असे बाळासाहेब म्हणाले. यांना राजकारणाचे गचकरण झाले आहे. राजकारण म्हणून ते आता खाजवत आहेत असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते.

Last Updated : Jan 24, 2022, 3:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details