मुंबई - मागील सहा महिन्यांपासून बंद असलेले बार-हॉटेल्स तसेच रेस्टॉरंट्स आजपासून सुरू झाले आहेत. मात्र धार्मिक स्थळ उघडण्यासाठी सरकारने अद्याप परवानगी दिली नसल्याने यावर अनेक लोक नाराज आहेत. यात भाजपाने महाविकास आघाडीच्या निर्णयावर टीका केली आहे. आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेसाठी काळा दिवस असल्याचे भाजपाच्या अध्यात्मिक सेलचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी म्हटले आहे.
'हा' महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेसाठी काळा दिवस... भाजपाची टीका! - temples in mumbai
आजचा दिवस महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेच्या दृष्टीने काळा दिवस आहे. कारण आजपासून राज्यात बार सुरू आणि मंदिरे बंद आहेत. ठाकरे सरकार "पब्ज अॅण्ड पार्टी गँग"चे सरकार आहे. हा काळा दिवस ज्या काळ्या सरकारने आणला, त्याचा आम्ही काळे वस्त्र घालून निषेध करतो, असे भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी म्हटले आहे.
आजचा दिवस महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेच्या दृष्टीने काळा दिवस आहे. कारण आजपासून राज्यात बार सुरू आणि मंदिरे बंद आहेत. ठाकरे सरकार "पब्ज अॅण्ड पार्टी गँग"चे सरकार आहे. हा काळा दिवस ज्या काळ्या सरकारने आणला त्याचा आम्ही काळे वस्त्र घालून निषेध व्यक्त करतो, असे भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी म्हटले आहे.
'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत राज्य सरकारने आजपासून बार व हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मंदिरे उघडण्यासाठी विरोधी पक्ष व अनेक लोकांची मागणी होत आहे. सरकारने अद्याप मिशन बिगेनअंतर्गत त्याला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मंदिर प्रशासन व लोकांमध्ये नाराजी आहे. यामुळे आज भाजपा अध्यत्मिक आघाडीने सत्ताधारी सरकारवर टीका केली आहे. या दोन दिवसांत सरकारने धार्मिक स्थळे सुरू केली नाहीत, तर न्यायालयात जाऊ, असा इशारा देखील भाजपा अध्यात्मिक आघाडीने दिला आहे.