मुंबई - शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने लोकल ट्रेन बंद आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना परिक्षा देता यावी म्हणून बेस्ट प्रशासनाने विशेष बस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी भाजपकडून करण्यात आल्याची माहिती बेस्ट समितीचे सदस्य सुनिल गणाचार्य यांनी दिली.
'मुंबईतून जेईई-नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी बेस्टने विशेष बस सोडाव्यात' - bjp update news
जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबर दरम्यान होणार असून, नीट परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. जेईईसाठी सुमारे ८.५८ लाख विद्यार्थ्यांनी, तर नीटसाठी सुमारे १६ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. जेईई मुख्य परीक्षेसाठी मुंबई आणि नवी मुंबईतील २० हजार २५६ आणि ठाण्यातील ७१९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
जेईई-नीट परिक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबर दरम्यान होणार असून, नीट परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. जेईईसाठी सुमारे ८.५८ लाख विद्यार्थ्यांनी, तर नीटसाठी सुमारे १६ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. जेईई मुख्य परीक्षेसाठी मुंबई आणि नवी मुंबईतील २० हजार २५६ आणि ठाण्यातील ७१९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने ट्रेन बंद असल्याने परीक्षा केंद्रापर्यंत कसे पोहोचायचे, असा प्रश्न विद्यार्थ्यांना भेडसावत आहे.
भाजपचे सरकार असलेल्या मध्य प्रदेश मध्ये जेईई-नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना संकटात वेळेवर परीक्षाकेंद्रावर उपस्थित राहता यावे, यासाठी परीक्षा काळात राज्य सरकार विद्यार्थ्यांसाठी मोफत वाहतूक सुविधा उपल्बध करून देणार आहे. याच धर्तीवर मुंबईमध्येही हजारो विद्यार्थ्यांना परीक्षा स्थळी वेळेवर आणि सुरक्षित पोहचता यावे म्हणून बेस्ट उपक्रमाने विशेष बसची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी बेस्टकडे केली असल्याची माहिती सुनिल गणाचार्य यांनी दिली.