मुंबई - पालिकेच्या ( Municipal Corporation ) चिटणीस विभागातील अधिकारी, कर्मचारी कंत्राटदारांना पैसे घेऊन प्रस्ताव देत आहेत. याबाबतची एक ऑडिओ क्लिप ( Audio clip ) बाहेर आली आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी पालिका आयुक्त ( Municipal Corporation Commissioner ) इकबाल सिंग चहल यांच्याकडे केली आहे.
तक्रारीकडे आयुक्तांचे दुर्लक्ष -
मुंबई महापालिकेचा कार्यकाळ 7 मार्च रोजी संपला आहे. पालिकेचा कार्यकाळ संपल्यावर आयुक्त इकबाल सिंग चहल यांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. आयुक्त प्रशासक झाल्यावर जे प्रस्ताव मंजूर केले जात आहेत. ते माजी नगरसेवकांना दिले जात नाहीत. आरटीआयच्या माध्यमातून हे प्रस्ताव मिळावा, असे सांगितले जाते. मात्र, त्याचवेळी पालिकेच्या चिटणीस विभागातील कर्मचारी अधिकारी पैसे घेऊन कंत्राटदाराना प्रस्ताव देत आहेत. याची तक्रार आयुक्तांना याआधीच दिली आहे. मात्र, आयुक्तांनी त्याकडे दुर्लक्ष केले असा आरोप शिंदे यानी केला आहे.