महाराष्ट्र

maharashtra

BJP Polkhol Campaign : पोलखोल रथ तोडफोड प्रकरणाच्या मास्टर माईंडवर कारवाई करावी, आशिष शेलारांची मागणी

By

Published : Apr 21, 2022, 4:04 PM IST

दोन दिवसांपूर्वी भाजपच्या 'पोलखोल रथा'ची काही अज्ञातांकडून ( Attack On BJP Polkhol Campaign Vehicle ) तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी भाजपने आंदोलनाचा पवित्रा ( BJP Agitation In Mumbai ) घेत आंदोलन छेडले होते. या प्रकरणाचा मास्टर माईंड कोण आहे, हे पोलिसांनी उघड करावे, अशी मागणी करत भाजपच्या शिष्टमंडळाने ( BJP Delegation Meet Police Deputy Commissioner ) आज चेंबूर येथे पोलीस उपायुक्त यांची भेट घेतली.

BJP Polkhol Campaign
BJP Polkhol Campaign

मुंबई -दोन दिवसांपूर्वी भाजपच्या 'पोलखोल रथा'ची काही अज्ञातांकडून ( Attack On BJP Polkhol Agitation ) तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी भाजपने आंदोलनाचा पवित्रा ( BJP Agitation In Mumbai ) घेत आंदोलन छेडले होते. यानंतर यातील दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. परंतु अजूनही तीन आरोपी फरार असून त्यांना अटक करावी, तसेच या प्रकरणाचा मास्टर माईंड कोण आहे, हे पोलिसांनी उघड करावे, अशी मागणी करत भाजपच्या शिष्टमंडळाने ( BJP Delegation Meet Police Deputy Commissioner ) आज चेंबूर येथे पोलीस उपायुक्त यांची भेट घेतली.

यामागचा मास्टर माईंड कोण?-मुंबई महानगरपालिकेतील मागील २५ वर्षाचा शिवसेनेचा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी मुंबईभर भाजपकडून पोलखोल अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे. दोन दिवसापूर्वी भाजपच्या पोलखोल रथावर चेंबूर येथे काही अज्ञातकांकडून दगडफेक करण्यात आली होती. या प्रकारानंतर भाजपने कारवाई करण्याची मागणी केली होती. अखेर पोलिसांनी यातील दोन जणांना अटक केली आहे. परंतु अद्यापही तीन आरोपी फरार आहेत. याप्रसंगी बोलताना भाजप नेते आशिष शेलार म्हणाले की, आमच्या मुद्द्याला ते मुद्द्याने उत्तर देऊ शकत नाही म्हणून त्यांनी आता हातात दगड घेतले आहेत. त्यांच्या दगडांना आम्हीसुद्धा दगडाने उत्तर देऊन. परंतु या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक करावी व यामागचा मास्टर माईंड कोण आहे, हे उघड करावे. कारण आम्हाला पूर्ण खात्री आहे, यामागे कोण आहे असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

आरोपींना तडीपार करण्यात यावे -याप्रसंगी बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की मागील २५ वर्षांमध्ये जनतेच्या पैशाची लूटमार शिवसेनेने केली आहे. काही लाख करोड मध्ये भ्रष्टाचार त्यांनी केला आहे. याबाबत आता त्यांची पोलखोल उघड होईल म्हणून ते पूर्णपणे घाबरले आहेत. यासाठी अशा पद्धतीने दगड मारण्याचं काम ते करत आहेत. परंतु या प्रकरणी आम्ही पोलिसांना असा इशारा दिला आहे, की यामागे जे कोण आहेत. त्यांना अटक करण्यात यावी. त्याचबरोबर अटक केल्यानंतर त्यांना कोर्टाकडून जामीन मंजूर होऊ शकतो म्हणून अशा पद्धतीची कृत्य ते पुन्हा करू शकतात. यासाठी त्यांना फक्त अटक करून चालणार नाही. तर त्यांना तडीपार करण्यात यावे, अशी मागणी सुद्धा केल्याचं दरेकर म्हणाले.

हेही वाचा -Aurangabad Crime News : चोरीच्या संशयावरून तरुणाला लाठ्याकाठ्याने बेदम मारहाण; तरुणाचा जागीच मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details