महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

BJP Criticizes Uddhav Thackeray : ऋतुजा लटके यांच्याबाबत ठाकरे गटाची बनवाबनवी, भाजपचा आरोप - Uddhav Thackeray group

उद्धव ठाकरे गट ( Uddhav Thackeray group ) ऋतुजा लटके ( Rituja Latke ) यांच्याबाबत बनवाबनी करीत असल्याचा आरोप भाजपने ( BJP ) केला आहे. ऋतुजा लटके यांना खरच उमेदवारी द्याची का? असा प्रश्न भाजपने उपस्थित केला आहे.

Rituja Latke
ऋतुजा लटके

By

Published : Oct 12, 2022, 9:36 PM IST

मुंबई -अंधेरी पूर्व येथील पोट निवडणुकीत निवडणूक ( Andheri East By Election ) लढवता यावी म्हणून ऋतुजा लटके ( Rituja Latke ) यांनी राजीनामा दिला आहे. मात्र हा राजीनामा पालिकेने स्वीकारलेला नाही. पालिका आयुक्तांवर सरकारचा दबाव असल्याचा आरोप शिवसेनेकडून ( Shiv Sena ) करण्यात आला आहे. मात्र नियमांचा बहाना करून बनवाबनवी सुरू आहे, त्याचे खापर प्रशासनावर फोडले जात आहे. असा आरोप पालिकेतील भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे ( BJP group leader Prabhakar Shinde ) यांनी केला आहे.

लटके यांच्या पत्नी सोबत बनवाबनवी -मुंबई महानगरपालिकेने ( Mumbai Municipal Corporation ) राजीनामा स्वीकराला नाही म्हणून आज ऋतुजा लटके ( Rituja Latke ) यांनी आज पालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray ) पक्षाचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उप महापौर हेमांगी वरळीकर, माजी नगरसेवक चंद्र शेखर वायंगणकर, बाळा नर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना सरकारचा दबाव असल्याचा आरोप माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे. यावर प्रभाकर शिंदे बोलत होते. यावेळी बोलताना, रमेश लटके माझे चांगले मित्र होते, शिवसेना वाढीसाठी आम्ही ग्रामीण भागात काम केले आहे. त्याच्या निधनाबाबत व्यक्तिशः सहानभूती आहे. मात्र त्यांच्या पत्नीबरोबर बनवाबनवी सुरु आहे असा आरोप शिंदे यांनी केला.


हा गोंधळ कोणी घातला -ऋतुजा लटके यांनी राजीनामा दिला आहे. हे दोन्ही राजीनामे नियमानुसार नाहीत. नियम कोणी पाळली नाही. एक महिन्याची नोटीस देऊन राजीनामे दिले गेले नाहीत. पहिला राजीनामा अटीसह होता, दुसरा राजीनामा देऊन एक महिना झालेला नाही. हा गोंधळ कोणी घातला असा प्रश्न उपस्थित करत याला भाजपा, किंवा प्रशासन जबाबदार नाहीत. त्या आजही कर्मचारी आहेत, पत्रकार परिषद घेऊन त्यांनी प्रशासनावर दबाव टाकला आहे. ऋतुजा लटके यांना पर्यायी चेहरा समोर आणण्यासाठी बनवाबनवी सुरू आहे असा आरोप शिंदे यांनी केला. कोर्टाने ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर केला तर आम्ही आक्षेप घेणार नाही. पालिका आयुक्तांनी काय करावे याचे उत्तर ते देतील असेही शिंदे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details