मुंबई - मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा आणि केंद्रशासित करण्याचा भाजपचा डाव (Mumbai Union Territory) असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. त्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईतील भाजपाचे पाच बडे नेते या कामात गुंतले आहेत. भाजपला सर्व आर्थिक निधी पुरवणारा मुंबईतील बडा बिल्डर भाजपशी संबंधित आहे. अशा बिल्डरचा यात मोठा वाटा आहे. मराठी माणसाचा मुंबईतील टक्का कमी झाल्याचे भाजपकडून भासवले जात आहे. त्यासाठी मुंबईत प्रेझेन्टेशन तयार केले जात असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. मात्र, महाराष्ट्रापासून मुंबई कधीही वेगळी होऊ देणार नाही, भाजपचा डाव हाणून पाडणार, असेही ते यावेळी म्हणाले.
Sanjay Raut claim BJP : मुंबई केंद्रशासित करण्याचा भाजपचा डाव; संजय राऊतांचा धक्कादायक आरोप - मुंबई केंद्रशासित करण्याचा भाजपचा डाव
मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा आणि केंद्रशासित करण्याचा भाजपचा डाव (Mumbai Union Territory) असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. याबाबत मुंबईत प्रेझेंटेशन तयार केले जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मात्र, महाराष्ट्रापासून मुंबई कधीही वेगळी होऊ देणार नाही, भाजपचा डाव हाणून पाडणार, असेही ते यावेळी म्हणाले.
किरीट सोमैया यांनी सांगावे पैसे गेले कुठे - विक्रांत वाचवण्यासाठी गोळा करण्यात आलेला पैसा कुठे गेला हे किरीट सोमैया आणि भाजपाने स्पष्ट करावे, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे. किरीट सोमैया जर म्हणत असतील हे प्रतीकात्मक कृती होती तर दहा दिवस पैसे का गोळा केले आणि ७११ खोकी कुठे गेली? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे. जनतेकडून जमा केलेल्या पैशाचा मी माझा आकडा सांगितला आहे. खरा आकडा काय आहे ते पोलीस तपासात उघड होईल, पोलीस ते शोधून काढतील, असेही राऊत यावेळी म्हणाले.
संजय राऊत यांची मानसिक अवस्था ढासळली - संजय राऊत यांच्या या मुंबई केंद्रशासित करण्याच्या आरोपावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांची मानसिक स्थिती बिघडल्याचे सांगितले आहे. अशा पद्धतीचा कुठलाही प्रयत्न अथवा प्रेझेन्टेशन भाजपाने केलेले नाही आणि कधीही करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.