मुंबई - अंधेरी पूर्व येथील आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने पोट निवडणूक ( Andheri Assembly By-Election ) होत आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके ( Rituja Latke nominated from Thackeray group ) यांना तर भाजपकडून माजी नगरसेवक मुरजी पटेल यांना उमेदवारी ( Murji Patel nominated by BJP ) देण्यात आली आहे. अंधेरी येथील पोट निवडणुकीत ( Andheri Assembly By-Election ) लटके, पटेल यांच्यात लढत होणार आहे. भाजपाचे उमेदवार लढवणारे मुरजी पटेल ( BJP candidate Murji Patel ) तसेच त्यांच्या पत्नी केसरबेन पटेल यांनी २०१७ च्या पालिका निवडणुकीत खोटे जात प्रमाणपत्र सादर केल्याने त्यांना एका वर्षात त्यांचे नगरसेवक पद ( corporator post was canceled ) रद्द करण्यात आले होते.
नगरसेवक पद केले रद्द -मुंबई महानगरपालिकेची २०१७ मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली होती. या निवडणुकीत भाजपकडून प्रभाग क्रमांक ७६ मधून केशरबेन पटेल व प्रभाग क्रमांक ८१ मधून भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी मुरजी आणि त्यांच्या पत्नी केसरबेन पटेल यांनी 'लेवा पाटील' जातीचे प्रमाणपत्र दिले होते. मात्र जात पडताळणी समितीने जातीबाबत दाखल केलेली कागदपत्रे पुरेशी नसल्यामुळे जात प्रमाणपत्र बोगस ठरवले होते. याला पटेल यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मुरजी पटेल आणि केसर पटेल यांची याचिका फेटाळून लावण्यात आली होती. यामुळे दोघांचेही नगरसेवक पद रद्द करण्यात आले होते. त्यांच्या जागी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणारे प्रभाग क्रमांक ७६ मधील नितीन सलाग्रे (काँग्रेस) व प्रभाग क्रमांक ८१ मधील संदीप नाईक (शिवसेना) यांना कोर्टाने विजयी घोषित केले होते.