महाराष्ट्र

maharashtra

Andheri East By Election : माझ्यावर कुठलाही दबाव नाही, मी अपक्ष निवडणूक लढवणार नाही - मुरजी  पटेल

By

Published : Oct 17, 2022, 3:56 PM IST

अंधेरी पूर्व, विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ( Andheri East Assembly By Election ) भाजपचे अधिकृत उमेदवार मुरजी पटेल ( Murji Patel ) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला ( Murji Patel withdrew his candidature ) आहे.

Murji Patel
मुरजी पटेल

मुंबई -अंधेरी पूर्व, विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ( Andheri East Assembly By Election ) भाजपचे अधिकृत उमेदवार मुरजी पटेल ( Murji Patel ) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला ( Murji Patel withdrew his candidature ) आहे. अतिशय चुरशीच्या होणाऱ्या निवडणुकीत मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. याविषयी बोलताना मुरजी पटेल यांनी, माझ्यावर कुठलाही दबाव नसून वरिष्ठांच्या आदेशानुसार अर्ज मागे घेतला आहे, असे सांगितले आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत खर्च होणारी ऊर्जा मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठेवा तिथे आपण तिचा सदुपयोग करू, असं मुंबई भाजप, अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले आहेत.

काय म्हणाले मुरजी पटेल?आमचे वरिष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मी आयुष्यभर काम करत राहीन. मी एखाद्या पदावर असो किंवा नसो मला काही फरक पडत नाही. माझ्यावर जे प्रेम करणारे आहेत त्यांच्याबरोबर मी रात्रभर काम करत राहीन. अंधेरीच्या जनतेने मला यापूर्वी सुद्धा साथ दिली आहे, यापुढेही ते अशीच साथ देत राहतील. मी आधीही काम करत होतो, यापुढे अधिक जोमाने त्यांच्यासाठी काम करत राहीन. लोकांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होईन. मी पक्षाचा कट्टर कार्यकर्ता आहे, माझ्यावर कुठलाही दबाव नाही व या कारणाने मी अपक्ष निवडणूक सुद्धा लढवणार नाही. भारतीय जनता पार्टी ही माझी आई आहे, असेही मुरजी पटेल यांनी सांगितले आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ऊर्जा जपून ठेवा - आशिष शेलारमुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या निर्णयावर बोलताना, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला आहे . या निर्णयाला संपूर्ण जनतेचा समर्थन आहे . भाजपने घेतलेली भूमिका ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला पुढे नेण्याचा एक भाग आहे. कार्यकर्त्यांनी आपली ऊर्जा राखून ठेवा, दोन महिन्यांनी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्या ऊर्जेचा सदुपयोग करू, असेही आशिष शेलार म्हणाले आहेत. कार्यकर्त्यांनी भाजपच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर बोलताना आशिष शेलार म्हणाले की, कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या भावनाला लोकशाहीत मान आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details