महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'सभागृह नेता' निवडण्यासाठी भाजपने बोलावली बैठक - सभागृह नेता निवडण्यासाठी भाजपने बोलावली बैठक

आगामी विधानसभेचा पक्षाचा 'गृह नेता' निवडण्यासाठी भाजपकडून 30 ऑक्टोबरला पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे.

'सभागृह नेता' निवडण्यासाठी भाजपने बोलावली बैठक

By

Published : Oct 26, 2019, 3:50 PM IST

Updated : Oct 26, 2019, 5:13 PM IST

मुंबई -भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाचा सभागृह नेता निवडण्यासाठी बैठक बोलावली आहे. मुंबईतील विधानभवनात होणाऱ्या या बैठकीला पक्षाचे सर्व नवनिर्वाचीत 105 आमदारांनी उपस्थित रहावे, अशा सुचना पाटील यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा... नव्या मंत्रीमंडळात "या" नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी? आयाराम ही होणार मंत्री?

राज्याच्या विधानसभा निवडणूक निकालाअंती राज्यातून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने, सभागृह नेता निवडण्यासाठी बैठक बोलावली आहे. 30 ऑक्टोबरला विधानभवनात ही बैठक होणार असून यासाठी सर्व 105 आमदारांनी उपस्थीत रहावे अशा सुचना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा... निवडणुकीतील पराभवामुळे भाजपच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन दिवस झाल्यानंतर येत्या बुधवारी भाजपच्या नव निर्वाचित आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत विधिमंडळ पक्ष नेता अर्थात मुख्यमंत्री पदाचा नेता निवडण्यात येणार आहे. एकीकडे भाजपला अपेक्षित असलेले पूर्ण बहुमत मिळाले नसल्याने पक्षाच्या गोटात निराशेचे वातावरण आहे, तर दुसरीकडे शिवसेनेच्या आमदारांनी आक्रमकपणे आलेल्या संधीचा लाभ घेत थेट मुख्यमंत्री पदाची मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. सद्य स्थितीत आवश्यक संख्याबळ नसल्याने भाजप काहीसा बॅकफूटवर असून शिवसेनेच्या हालचालींकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे लक्ष आहे

हेही वाचा... विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच, पवार कोणाच्या गळ्यात टाकणार माळ?

या सर्व पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येत्या बुधवारी विधानभवनाच्या भाजप कार्यालयात सर्व आमदारांची बैठक बोलावल्याने, या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे शिवसेनेसोबत अद्याप कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नसताना भाजप आपला विधिमंडळ नेता ठरवणार आहे. विशेष म्हणजे निवडणुकीच्या आधी निवडणूकीच्या रिंगणात भाजप उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी केलेल्यांना देवेंद्र फडणवीस यांनी थेट इशारा दिला होता की, त्या बंडखोरांना पुन्हा महायुतीत प्रवेश मिळणार नाही. मात्र आता भाजपला संख्याबळ वाढवण्याची आवश्यकता असताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Last Updated : Oct 26, 2019, 5:13 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details