मुंबई - महाविकास आघाडीतील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांचा विभागातील मंत्रिमंडळात मंगळवारी एक प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यावर सचिव आणि मंत्री यांच्यात मोठ्याप्रमाणात चर्चा आणि खडाजंगी झाली. शेवटी मंत्रिमंडळात मांडलेला प्रस्ताव मागे घेण्यात आला. सरकारमधील मंत्री आणि प्रशासनातील अधिकारी यांच्यात काही प्रस्तावावरून समन्वय नसल्याचे कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिसून आले. त्यावर विरोधी पक्षातील आमदार आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांवर सडकून टीका केलेली आहे.
मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत रब्बी हंगामाचा गहू किमान आधारभूत किमतीवर खरेदी करण्याचा ३० कोटी रुपयांचा प्रस्ताव होता. हा प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना न सांगतात थेट मंत्रिमंडळ बैठकीत मांडला गेला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्याचे काम मंत्र्यांनी करायचे असते. पण हा प्रस्ताव थेट सचिवांनी मांडायला सुरुवात केली. तेव्हा छगन भुजबळ यांनी त्याला तीव्र आक्षेप घेतला. मी या विभागाचा मंत्री आहे की नाही? ते आधी स्पष्ट करा, मग हा प्रस्ताव मांडा. असा संतप्त सवाल छगन भुजबळ यांनी केला होता.
हेही वाचा...ठाणे : कळव्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक केणी यांचा मृत्यू, कोरोनाशी देत होते झुंज
त्यानंतर सर्वच मंत्र्यानी आक्षेप घेतला. मंत्र्यांना अंधारात ठेवून प्रस्ताव आणण्याची हिंमत होते कशी, असा सवाल जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला होता. तर माजी मुख्यमंत्री व बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळात कोणते प्रस्ताव आणायचे, हे नोकरशाही ठरवणार का? असा सवाल केला होता. मंत्रीमंडळातील या खडाजंगी वरून भाजप नेते आशिष शेलार यांनी सरकार आणि प्रशासनात समन्वय नसल्याचे दाखवण्यासाठी कवितेतून चिमटा काढलेला आहे.
भाजप नेते आशिष शेलार यांनी या कवितेचे ट्विट केले आहे;
महत्त्वाचा नाही, इथं शेतकऱ्यांचा सोनेरी गहू