मुंबई - महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून भाजप आणि शिवसेना या दोघा पक्षांनीही ( Shivsena municipal election strategy ) एकमेकांच्या गडावर लक्ष केंद्रित केले आहे. भाजपकडून मुंबई महानगरपालिका तर शिवसेनेकडून नागपूर महानगरपालिकेसाठी ( BJP BMC election preparation ) रणनीती तयार आहे. एकमेकांचे गड जिंकण्याचे प्रयत्न पुढील महानगरपालिका निवडणुकीमध्ये दिसतील, असे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त ( political analysts upcoming election ) करण्यात येत आहे.
युतीत असलेल्या शिवसेनेने भारतीय जनता पक्षापासून लांब होत महाविकास महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे भारतीय जनता पक्षाच्या हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास हिरावून गेला आहे. या घटनेनंतर दोन्ही पक्षांमध्ये राजकीय वैर दिवसेंदिवस वाढतच पाहायला मिळत आहे. शिवसेनेने घेतलेल्या या भूमिकेमुळे भाजपने शिवसेनेला अद्दल घडवण्यासाठी आपली रणनीती ( BJP politics against Shivsena ) तयार केली आहे. मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचे असलेले वर्चस्व कमी करण्यासाठी भाजपकडून आता तयारी सुरू ( BJP vs Shivsena in BMC ) झाली आहे. वर्षानुवर्षे एकमेकांच्या ताब्यात असलेली महानगरपालिका आपल्या ताब्यात घेऊन विरोधी पक्षाला झक्कास देण्यासाठी शिवसेना आणि भाजप प्रयत्न करत असल्याचे मत राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो ( Pravin Puro on BMC election ) यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई मनपासाठी भाजपची रणनीती- शिवसेनेची पूर्ण ताकद ही मुंबई महानगरपालिका असल्याची बाब भाजपने हेरली आहे. युतीत असलेल्या शिवसेनेवर वचक ठेवण्यासाठी 2017 च्या महापालिका निवडणुकामध्येदेखील भाजपने मोठे प्रयत्न केले होते. युतीत असूनही महानगरपालिकेच्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले. वेगळे लढूनही शिवसेनेने महानगरपालिकेवर आपले वर्चस्व कायम ठेवले. मात्र, या निवडणुकीमध्ये शिवसेनेला 84 तर भारतीय जनता पक्षाला 82 नगरसेवक निवडून आणता आले होते. केवळ दोन जागा शिवसेनेला अधिकच्या मिळाल्या होत्या. त्यामुळे 2022 मध्ये होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेला शिकस्त देण्यासाठी भाजपकडून रणनिती आखली गेली आहे.
शिवसेनेचे घोटाळे बाहेर आणण्याचा इशारा-भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपकडून नेत्यांची एक फळी तयार करण्यात आली आहे. महानगरपालिकेमध्ये सुरू असलेला शिवसेनेचा भोंगळ कारभार मुंबईकरांसमोर ठेवण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. याच माध्यमातून भाजपकडून शिवसेनेच्या विरोधात मुंबईभर भाजपकडून 'पोलखोल यात्रा' सुरू करण्याचा निर्धार भाजपने केला आहे. या पोल-खोल यात्रेच्या माध्यमातून शिवसेनेने महानगरपालिकेमध्ये केलेले घोटाळे मुंबईकरांच्या समोर आणू, असा इशारा खुद्द राज्याचे विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.