मुंबई -आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. यावरून आता सामनाच्या अग्रलेखातूनही टीका करण्यात आली आहे. तसेच मुंद्रा बंदरावर सापडलेल्या अमली पदार्थांवरूनही केंद्राला लक्ष करण्यात आले आहे. जर भारतीय जनता पक्ष सर्व तपास यंत्रणांचे मालक आपणच आहोत असे मानून चालत असेल तर लोकशाहीत मालक' बदलत असतात, हे भाजपने व त्यांचे राजकीय हुकूम ऐकणाऱ्या यंत्रणांनी पक्के लक्षात घेतले पाहिजे. खोटे साक्षीदार, बेताल बडबड, बँकांना, सार्वजनिक संस्थांना हजारो कोटींचा गंडा घालून पुन्हा आर्यन खानसारख्या प्रकरणातही वसुली करणाऱ्यांच्या हाती पक्षाच्या नाडया आहेत, या नाड्य़ांची गाठ कधीही सैल होईल व उघडे आहेत ते नागडे होतील, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
सत्य काय ते घबाडबाज अधिकाऱ्यांनाच माहिती -
पुढे लिहीताना, भारतीय जनता पक्षाचा जन्म काही पवित्र झम्यातून झालेला नाही. हा पक्षसुद्धा इतर राजकीय पक्षांप्रमाणे हाडा-मांसाचाच बनलेला आहे. त्यांचेही पाय मातीचेच आहेत. हे त्यांच्या प्रमुख लोकांनी समजून घेतले पाहिजे. त्यामुळे सत्तेची तागडी वर-खाली होतच असते, हे त्यांनी विसरू नये, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून या पक्षाने महाराष्ट्रात जो धुमाकूळ घातला आहे त्यातले एक एक प्रकरण त्यांच्यावरच उलटताना दिसत आहे. त्यातले नवे प्रकरण म्हणजे कॉ्डेलिया क्ुझवरील डग्ज पार्टीतले उपट्ट्याप. या क्रुझवर काही तरुण पोरांनी अमली पदार्थांचे सेवन केले किंवा बाळगले. सत्य काय ते त्या धाडबाज व घबाडबाज अधिकाऱ्यांनाच माहीत. त्या कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगाही सापडला, खानचा मुलगा आर्यन याच्यामुळे या प्रकरणास वारेमाप प्रसिद्धी मिळत आहे व त्या प्रसिद्धीमुळे एनसीबीचे उत्सवमूर्ती अधिकारी बेबंद आणि बेभान झाले, असा टोलाही अग्रलेखातून लगवाण्यात आला आहे.