मुंबई - महानगरपालिकेच्या प्रभाग समित्यांच्या निवडणुकांदरम्यान पालिका अधिकारी अनुपस्थित राहिले. अधिकारी अनुपस्थित असल्याने सभागृह नेत्यांनी पालिका आयुक्तांना फोन केला. मात्र आयुक्तांनी उद्धट वागणूक दिली, त्यामुळे महापौरांनी आपल्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. हा प्रकार दुर्दैवी असून सत्ताधारी विकलांग, महापौर हतबल आणि प्रशासन उद्दाम झाले असल्याची टीका भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे. तर पालिकेतील सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वाचक राहिला नसल्याचा आरोप काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे.
दुर्दैवी चित्र मुंबईकरांच्या समोर आले आहे. महापौरांचा सभागृह नेत्यांचा अपमान याचा भाजपा निषेध करत आहे. महापौर सभरूच नेते नव्हे तर कोणत्याही लोकप्रतिनिधींचा अपमान होता कामा नये, अशी आमची भूमिका आहे. मात्र आज जो पालिकेत प्रकार घडला आहे. त्यावरून सत्ताधारी पक्ष विकलांग आहे, महापौर हतबल आहेत आणि प्रशासन उद्दाम झाले असल्याचे चित्र समोर आले आहे, अशी टिका भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.
जो बुंद से गई वो हौद से नाही आती
महापौरांचा कर्मचारी वर्गही आज उपस्थित नव्हता. अधिकारी कर्मचारी का उपस्थित राहिले नाहीत, असा प्रश्न उपस्थित करत चिटणीस विभागाने निवडणुकीसाठी या अधिकाऱ्यांना निमंत्र दिले होते का? याची चौकशी करण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे. महापौरांच्या अपमानाला जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. भविष्यात कोणत्याही लोकप्रतिनिधींचा अपमान होणार नाही याची पालिका प्रशासनाने काळजी घ्यावी, अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे. आयुक्तांनी माफी मागितली असली तरी जो बुंद से गई वो हौद से नाही आती असे शिंदे यांनी म्हटले आहे. प्रशासन कशा प्रकारे वागत आहे हे भाजपा सत्ताधारी शिवसेनेच्या वारंवार निदर्शनास आणत आहे. मात्र त्याकडे दुर्लसख केले जात असल्याने आजचा प्रकार घडल्याचे शिंदे म्हणाले.