मुंबई - बीकेसीमध्ये उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करावी. तसेच या सेंटरची उभारणी करण्याचे काम दिलेल्या रोमिल बिल्डरशी पालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि सत्ताधारी यांचे काय संबंध आहेत याची चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे पालिकेतील विरोधी पक्षनेते विनोद मिश्रा यांनी केली आहे.
बीकेसी कोविड सेंटरमध्ये वस्तू खरेदीत भ्रष्टाचार, चौकशी करण्याची भाजपची मागणी - बिकेसी कोव्हीड सेंटर
बीकेसीमध्ये उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे पालिकेतील पक्षनेते विनोद मिश्रा यांनी केली आहे.
भाजपचे मुंबई महापालिकेतील पक्षनेते विनोद मिश्रा यांनी गटनेते प्रभाकर शिंदे व मुलुंडचे भाजप आमदार मिहीर कोटेचा यांच्या उपस्थितीत पालिका मुख्यालयात आज एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी बिकेसी येथील कोव्हीड सेंटरमध्ये वापरण्यात आलेल्या वस्तूमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. यावेळी बोलताना कोव्हीड सेंटरमध्ये मुख्यमंत्र्यानी 2 हजार बेड असतील असे सांगितले होते. मात्र, यात 1 हजार ते दिड हजार बेड असल्याचा आरोप मिश्रा यांनी केला आहे.