मुंबई - नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून भाजप आक्रमक ( BJP Aggressive Against Nana Patole ) झाली असून मुंबई, पुण्यामध्ये नाना पटोले यांच्या विरोधात भाजपने आंदोलन, निदर्शने ( BJP Movement in mubmai ) सुरू आहेत. मुंबईत भाजप नेते प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली गोमूत्र पाजा असे आंदोलन सुरू आहे.
मुंबईत प्रसाद लाड यांचे आंदोलन नाना पटोले विरोधात भाजप आक्रमक -
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर भाजप राज्यभर आक्रमक ( BJP Leader attack on Nana Patole ) झाली असून त्यांनी नाना पटोले विरुद्ध आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. राज्यभर नाना पाटोले विरोधात आंदोलन सुरू आहेत. नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना एका गावगुंडांशी केली होती. मोदी नावाच्या गावगुंडा बाबत त्यांनी भाष्य केले होते. आज मुंबईमध्ये भाजप नेते प्रसाद लाड यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. नाना पटोले यांच्या पोस्टरला गोमूत्र पाजून त्यांना शुद्ध करण्यात आलं आहे, असे भाजप नेते प्रसाद लाड यांनी याप्रसंगी सांगितले.
'सत्ता गेल्यामुळे भाजपची तडफड'
पहाटे मिळालेली सत्ता गेल्यामुळे भाजप पाण्या बाहेरील माशासारखा तडफडत आहे. त्यामुळे राज्यातील सत्ता बरखास्त करण्यापेक्षा केंद्रातील सत्ताच बरखास्त करा अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटेल यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना काल टोला लगावला होता. पाटील यांनी राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी केली होती. त्यावर नाना पटोले यांनी ही प्रतिक्रिया दिली होती.
पुण्यात भाजपाची निदर्शने -
पुणे -पुण्यात गेल्या आठवड्यात 'आपण मोदींना शिव्या देऊ शकतो, मोदींना मारू शकतो' असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे प्रतिसाद पाहायला मिळाले. त्यानंतर काल पुन्हा नाना पटोले यांनी नाशिक येथे बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 'ज्याची बायको पळते, त्याचे नाव मोदी ठरते', असे त्यांनी म्हंटले आहे. या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा नवा वाद सुरू झाला असून या विरोधात पुण्यात भारतीय जनता पक्षाच्यावतीने अलका चौक येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली आहे.
चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया पटोलेंची मानसिक तपासणी करावी लागेल - चंद्रकांत पाटील
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर पुन्हा राज्यातील राजकारण हे तापले असून आज राज्यभर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील नाना पटोले ( Chandrakant Patil criticizes Nana Patole ) यांच्यावर टिका केलीय. ते म्हणाले की राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आत्ता काँग्रेस पक्षाने अंडर ऑफझर वेशनमध्ये ठेवायला पाहिजे. त्यांची शारीरिक आणि मानसिक तपासणी करावी लागेल की नेमकं यातील मानसशास्त्र काय ? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वारंवार टीका करत आहेत. यांना म्हणायचं काय आहे. यांचा नेमकं हेतू काय ? यांच्या शरीरात काही प्रॉब्लेम झाला आहे का की अश्या पद्धतीने देशाच्या सर्वांच्या नेत्याबाबत असे वक्तव्य करणे हे चुकीचे आहे. अशी टीका यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केली.
ठाण्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांची प्रतिक्रिया नाना पटोले सडलेल्या मेंदूचा राजकारणी - शशिकांत कांबळे
ठाणे - कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेला अक्कल नसून डोक्यावर पडलेला राजकारणी नेता असून नाना पटोले सडलेल्या मेंदूचा राजकारणी असल्याचे खळबळजनक वक्तव्य कल्याण - डोंबिवली भाजपा जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केले. या विधानाचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत असून भाजपा मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाली आहे. आज डोंबिवलीतही भाजपाचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली रेल्वे स्थानकासमोरील स्वर्गीय इंदिरा गांधी चौकात नाना पटोले यांच्या विरोधात आंदोलन करून भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.
हेही वाचा -Devendra Fadnavis on Thackeray: बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवले, असे तुमचे म्हणणे आहे का ? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल