मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्राप्रमाणेच मध्यप्रदेश सरकारलाही निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. भाजपने यावरून काँग्रेसवर टीकास्त्र ( Congress Leader Attack On BJP Agenda ) सोडले होते. भाजपच्या टीकेला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रत्युत्तर दिले. बहुजनांना आरक्षणाचे कोणतेच अधिकार मिळवून द्यायचा नाहीत, अशी भाजपची नीती असल्याचा आरोप ( Atul londhe about OBC reservation ) केला. भाजप आणि काँग्रेसमध्ये आता यावरून जुंपण्याची शक्यता आहे. ( Atul londhe alleges on BJP )
लोंढे यांची भाजपावर सडकून टीका - देशात महाराष्ट्र प्रमाणेच इतर काही राज्यांमध्ये ओबीसीचा प्रश्न गंभीर बनला आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली न निघाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आरक्षणाशिवाय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. आता मध्यप्रदेश मध्येही महाराष्ट्राच्या निर्णया प्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक झाला आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. काँग्रेस मुळेच ओबीसींचे आरक्षण गेल्याचा आरोप भाजपकडून नुकताच करण्यात आला. महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आरोपांचे खंडन करताना सडकून टीका केली.