महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Offensive Tweet Against Rashmi Thackeray : रश्मी ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याला अटक - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरे यांच्याबद्दल ट्विटरच्या माध्यमातून आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी ( Offensive Tweet Against Rashmi Thackeray ) भाजप पदाधिकाऱ्यांला सायबर पोलिसांनी अटक केली ( Jiten Gajaria Arrested by Mumbai Police ) आहे.

जितेन गजारिया
जितेन गजारिया

By

Published : Jan 6, 2022, 4:37 PM IST

मुंबई -राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल ट्वीटरच्या माध्यमातून भाजपाचे पदाधिकारी जितेन गजारिया या ट्वीटर वापरकर्त्याने आक्षेपार्ह ट्वीट केले ( Offensive Tweet Against Rashmi Thackeray ) आहे. महाराष्ट्राची राबडीदेवी, अशा शब्दात जितेन गजारिया यांनी रश्मी ठाकरे यांचा उल्लेख केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर पथकाने त्यास अटक केली ( Jiten Gajaria Arrested by Mumbai Police ) आहे.

गजारियाने कलेले ट्वीट

सायबर पोलिसांनी केली अटक

दरम्यान, सामनाच्या संपादक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी ( CM Uddhav Thackeray Wife ) रश्मी ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत समाज माध्यमावरून आक्षेपार्ह विधान करणाऱ्या जितेन गजारियाला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. असे आक्षेपार्ह ट्वीट त्यांनी का केले आणि त्यामागे त्यांचा काय उद्देश होता, याबाबत पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.

हे ही वाचा -Devendra Fadnavis on PM Security : पंतप्रधानचा ताफा अडवणे हे काँग्रेसचे षड्यंत्र- देवेंद्र फडणवीस

ABOUT THE AUTHOR

...view details