मुंबई -कोरोनामुळे सध्या देशात मंदीचे वातावरण असून, सर्व व्यवाहार ठप्प झाले आहेत. मात्र असे असताना देखील एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आयआयटी मुंबईत सुरू असलेल्या प्लेसमेंटमध्ये पहिल्याच दिवशी तब्बल 18 कंपन्यांनी सहभाग घेतला.'ऑप्टिव्हर' या कंपनीने एका विद्यार्थ्याला तब्बल 1 कोटी 40 लाखांच्या पॅकेजची ऑफर दिली आहे. तर आयआयटी मद्रास आणि आयआयटी मंडीमधील विद्यार्थ्यांना देखील चांगल्या पॅकेजवर नोकऱ्या मिळाल्या आहेत.
देशातील सर्व आयआयटी कॉलेजमध्ये या वर्षीचा प्लेसमेंटचा हा पहिला हंगाम सुरू झाला आहे. आयआयटी मुंबईत पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात १८ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यात मायक्रोसॉफ्ट, गुगल, टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स, क्वालकॉम, बोस्टन कन्सलटिंग ग्रुप, यासरख्या कंपन्यांनी सहभाग घेतला. तर यंदा 153 विद्यार्थ्यांनी प्लेसमेंट पूर्व ऑफर्स स्वीकारल्या आहेत, असे संस्थेकडून सांगण्यात आले. देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्लेसमेंटवर परिणाम होईल, अशी भीती विद्यार्थ्यांना वाटत होती. मात्र पहिल्या हंगामातील प्लेसमेंटला कंपन्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सर्वाधिक नोकऱ्या आयटीमध्ये