नवी मुंबई - उरण पनवेल महामार्गावर गव्हाण फाटा येथे 21 वर्षीय बाईक रायडर तरुणीचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सेजल अंबेटकर असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. (Biker Girl Accident On Uran Panvel Highway ) रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रकला बाईकस्वार तरुणीने मागून धडक दिल्याने हा अपघात घडला. या धडकेत तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी सेजलला तात्काळ कामोठे येथील (MGM) रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारा दरम्यान सेजलचा मृत्यू झाला.
Biker Girl Accident: उरण पनवेल मार्गावर बाईकस्वार तरुणीचा ट्रकच्या धडकेत मृत्यू - ट्रकला बाईकस्वार तरुणीने मागून धडक
उरण पनवेल मार्गावर गव्हाण फाटा येथे 21 वर्षीय बाईक रायडर तरुणीचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. (Biker Girl Accident)
अपघात
ज्या ट्रकला सेजलच्या बाईकने धडक दिली त्या ट्रकचा चालक मात्र फरार झाला आहे. सेजल उरण येथे आपल्या नातेवाईकांकडे रहात होती. रायगड जिल्ह्यातील म्हसळा हे तीचे मूळ गाव आहे. या अपघातामुळे पुन्हा एकदा अवैध तसेच चुकीच्या ठिकाणी पार्किंगचा मुद्दा चर्चेत आला आहे. अशा प्रकारच्या ट्रक पार्किंगमुळे उरण तसेच जेएनपीटी मार्गावर अनेक दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागला आहे.