मुंबई - कांदिवली पोलीस स्टेशन परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी काही लोकांवर गोळीबार ( Kandivali Firing ) केला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहेत. पुढील तपास सुरू असल्याची माहिती डीसीपी झोन-11 विशाल ठाकूर यांनी दिली. मुंबईत अचानक झालेल्या गोळीबाराच्या ( Mumbai Firing ) घटनेने खळबळ उडाली आहे. या गोळीबारात अंकित यादव, अविनाश दाभोलकर, मनीष गुप्ता, प्रकाश नारायण अशी गोळीबारात जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत.
Kandivali Firing : गणेशोत्सवातील वाद, रात्रोत्सवात गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू - Mumbai Police
कांदिवली पोलीस स्टेशन परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी काही लोकांवर गोळीबार ( Kandivali Firing ) केला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. अंकित यादव, अभिनाश दाभोलकर, मनीष गुप्ता, प्रकाश नारायण अशी गोळीबारात जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत.

जुन्या वैमनस्यातून गोळीबार केल्याचा संशय -गोळीबाराची घटना परस्पर वादातून घडल्याचे पोलिसांचे ( Mumbai Police ) म्हणणे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वैमनस्यातून हा प्रकार घडला आहे. या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव अंकित यादव असल्याचे सांगण्यात येत आहे. गोळीबार करणारे लोक या घटनेतील पीडिता एकमेकांना आधीच ओळखत असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपींनी घाईगडबडीत चार राऊंड गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
गोळीबार करून आरोपी घटनास्थळावरून पळून गेले -मुंबई पोलिसांचे डीसीपी विशाल ठाकूर ( DCP Vishal Thakur) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन मुले दुचाकीवर आली आणि त्यांनी कांदिवलीमध्ये ( Kandivali ) गोळीबाराची घटना घडवली. गोळीबार करून दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी तेथून पळ काढला. या गोळीबाराच्या घटनेमागे नेमके कारण काय, याचा तपास सुरू आहे. सध्या तिन्ही जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 9 सप्टेंबर रोजी मुंबईतील वांद्रे भागातही गोळीबाराची घटना घडली होती, ज्यामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाला होता.