महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Scandal at reputed bank in Mumbai : मुंबईतील एका प्रतिष्ठित बॅंकेत मोठा घोटाळा; बँक कर्मचाऱ्याला अटक - 83 क्रेडिट कार्डवरील कॅशबॅक वळवला

मुंबईतील एका प्रतिष्ठित बॅंकेत 4 कोटींचा कॅशबॅक घोटाळा झाल्याचे आढळून आले आहे. ( 4 crore cashback scam in Mumbai bank ) आरोपीने क्रेडिट कार्डधारकांना कॅश बॅकच्या माध्यमातून 4.1 कोटींचा गंडा घातला आहे. त्यातील प्रमुख आरोपी नितीन खरेला अटक करण्यात आली आहे. ( Nitin Khare arrested the bank employee )

Mumbai Police
मुंबई पोलिस

By

Published : May 22, 2022, 10:43 AM IST

मुंबई : क्रेडिट कार्डधारकांना कॅशबॅकच्या माध्यमातून 4.1 कोटी रुपयांचा गंडा ( 4.1 crore cashback scam ) घातल्याप्रकरणी मुंबईतील एका बँक कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. ( Mumbai bank employee arrested in cashback scam ) आरोपी नितीन खरे बँकेत कंत्राटी पद्धतीने काम करीत होता, त्याने 56 ग्राहकांकडे असलेल्या 83 क्रेडिट कार्डवरील कॅशबॅक वळवला, ( Defendant diverted cashback on 83 cards )असे पोलिसांनी सांगितले. त्याचा वापर ग्राहकांच्या शॉपिंग आणि मिळालेल्या कॅशबॅकचा डेटा हाताळण्यासाठी केला जात असे.

अशा प्रकारे करीत होते फसवणूक : ही फसवणूक जानेवारी ते ऑगस्ट 2021 दरम्यान करण्यात आली होती. काही ग्राहकांना त्यांच्या क्रेडिट कार्ड खात्यावर कधीही खरेदी न करताही कॅशबॅक येत असे. याबद्दल त्यांनी बँकेकडे तक्रार केली होती. तसेच, त्यांच्या खात्यातून कॅशबॅकचा ताबडतोब लाभ घेतल्याचे ग्राहकांनी निदर्शनास आणून दिले. यामुळेच बँकेला या प्रकरणाचा तपास करावा लागला अखेरीस ग्राहकांची फसवणूक झाल्याचे उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले.


बॅंकेच्या निदर्शनास प्रथम आणून दिलेले तक्रारदार : बँकेला 31 ऑगस्ट 2021 रोजी त्यांच्या कार्ड वापरणाऱ्या सुखविंदर सिंग यांच्याकडून पहिली तक्रार प्राप्त झाली होती आणि दुसरी तक्रार 25 सप्टेंबर 2021 रोजी प्रियंका नावाच्या ग्राहकाकडून प्राप्त झाली होती. कोणतीही खरेदी न करूनदेखील त्यांच्या कार्ड स्टेटमेंटमध्ये कॅशबॅक क्रेडिट दाखवत असल्याची त्यांची तक्रार होती.


गुन्ह्याचे व्यापक स्वरूप : बँकेच्या 56 ग्राहकांना कॅशबॅक मिळाल्याचे बँकेला आढळून आले होते आणि तेवढीच रक्कम आरोपी नितीन खरेच्या कार्डवर जमा झाल्याचे आढळले. खरे याने 500 जणांची फसवणूक करून कॅशबॅक दिले आहेत. याचा फायदा खरे आणि त्याच्या मित्रांना झाला, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील आरोपी खरे आणि त्याचे मित्र ऑगस्ट 2021 पासून फरार होते. त्यातील प्रमुख आरोपी खरे याला अटक करण्यात आली आहे.





हेही वाचा : मुंबई शहर सहकारी बॅंकेत कर्ज वाटपात मोठा आर्थिक घोटाळा; अधिकाऱ्यासह व्यापारी अटकेत

ABOUT THE AUTHOR

...view details