महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Big Breaking : कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, ममता बॅनर्जी यांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया - undefined

big breaking
big breaking

By

Published : Nov 30, 2021, 11:27 AM IST

Updated : Nov 30, 2021, 8:25 PM IST

20:23 November 30

परदेशातून आलेल्या राज्यातील 6 जणांना कोरोनाची लागण

मुंबई - दक्षिण आफ्रिका किंवा इतर देशांमधून आलेले सहाजण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यातील मुंबई कॉर्पोरेशन, कल्याण-डोंबिवली कॉर्पोरेशन, मीरा-भाईंदर कॉर्पोरेशन आणि पुणे येथील प्रत्येकी एक, पिंपरी-चिंचवड कॉर्पोरेशनमध्ये नायजेरियातील 2 अशांचा यात समावेश आहे. याबाबतची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. हे सर्व नमुने जीनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. या सर्व प्रवाशांची चाचणी कोविड-19 पॉझिटिव्ह असली तरी ते लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेले आहेत.

20:11 November 30

कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, ममता बॅनर्जी यांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

मुंबई - कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांच्या सोबतच्या भेटीनंतर दिली आहे. ममता बॅनर्जी यांची आज मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली आहे.

19:24 November 30

ममता बॅनर्जी यांच्या भेटीसाठी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत ट्रयडंट हॉटेलमध्ये पोहचले

मुंबई - ममता बॅनर्जी यांच्या भेटीसाठी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत ट्रयडंट हॉटेलमध्ये पोहचले आहेत. ममता बॅनर्जी या दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत.

17:02 November 30

खंडणी प्रकरणाच्या चौकशीसाठी परमबीर सिंग पुन्हा कोकण भवनमधील सीआयडी कार्यालयात दाखल

नवी मुंबई - बेलापूर सीआयडी कार्यालयात परमबीर सिंग यांची सोमवारी पाच तास चौकशी करण्यात आली होती. श्यामसुंदर अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खंडणी प्रकरणी परमबीर सिंग यांच्यावर सीआयडीच्या माध्यमातून प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली होती. त्यांना मंगळवारी पुन्हा सीआयडीने चौकशीसाठी नवी मुंबईतील बेलापूरमधील कोकण भवन येथे बोलावले होते. त्याप्रमाणे परमबीर सिंग हे नवी मुंबईतील सीआयडी कार्यालयात दुपारनंतर दाखल झाले.

16:05 November 30

तब्येतीच्या कारणामुळे मुख्यमंत्री ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांची भेट होणार नाही

मुंबई -आरोग्याच्या समस्यांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार नाहीत. ममता बॅनर्जी या दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत.

15:27 November 30

परमबीर सिंग-सचिन वाझे भेटीची आमच्याकडे माहिती नाही - नवी मुंबई पोलीस आयुक्त

नवी मुंबई - नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग म्हणाले की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि बडतर्फ पोलीस सचिन वाझे यांच्यातील कथित भेटीबाबत आमच्याकडे कोणतीही माहिती नाही.

12:32 November 30

मुंबईत १५ डिसेंबर पासून शाळा सुरू होणार

शाळांबाबत मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय
१ डिसेंबरला प्रत्यक्ष शाळा सुरू होणार नाहीत
१५ डिसेंबर पासून शाळा सुरू होणार
१ ली ते ७ वि शाळा १५ तारखे नंतरच सुरू होणार

06:13 November 30

big breaking updates maharashtra

मुंबईत वरळी येथे गॅस सिलेंडरचा स्फोट, 4 जण जखमी, दोन गंभीर, जखमींवर नायर रुग्णालयात उपचार सुरू

Last Updated : Nov 30, 2021, 8:25 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details