महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Breaking : भीषण चकमकीत गडचिरोलीत पाचपेक्षा अधिक नक्षलवादी ठार - undefined

big breaking
big breaking

By

Published : Nov 13, 2021, 10:33 AM IST

Updated : Nov 13, 2021, 4:20 PM IST

16:18 November 13

भीषण चकमकीत पाचपेक्षा अधिक नक्षलवादी ठार, आकडा वाढण्याची शक्यता

गडचिरोली - पोलीस आणि नक्षलवादी (gadchiroli naxal attack) यांच्यात भीषण चकमक झाली आहे. यात पाचपेक्षा जास्त नक्षलवादी ठार झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. 

15:51 November 13

अन्नत्याग केलेल्या आंदोलकाची तब्येत ढासळली

सोलापूर ब्रेकिंग

एसटी आंदोलन;अन्नत्याग केलेल्या आंदोलकाची तब्येत ढासळली

शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल; विभाग नियंत्रकांच्या मध्यस्थीने ज्यूस देण्यात आला

13:26 November 13

महागाईवरून लक्ष हटविण्यासाठी दंगली घडवल्या जाताहेत - राऊत

औरंगाबाद -महागाईवरील लक्ष हटावे म्हणून अमरावतीत, राज्यात दंगे घडवून आणले जात आहे, असा हल्लाबोल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. महागाईविरोधातील मोर्चात ते बोलत होते. केंद्रातील सरकार महागाईविरोधात बोलत नाही. मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्याचे काम करीत आहे. 

12:15 November 13

टीएमसीने दिली लुइझिन्हो फालेरो यांना राज्यसभेसाठी उमेदवारी

पणजी - तृणमूल काँग्रेसने लुइझिन्हो फालेरो यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. फालेरो हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. सप्टेंबरमध्ये त्यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला होता. 

10:54 November 13

आंदोलन नागरिकांचा अधिकार मात्र ते अनियंत्रित असू नये - नवाब मलिक

मुंबई - आंदोलन करणे नागरिकांचा अधिकार आहे. मात्र ते अनियंत्रित असू नये. काही अराजक शक्ती आंदोलनाला चिथावणी देत आहेत. मात्र नागरिकांनी, आंदोलकांनी शांतता पाळावी, असे आवाहन अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे. 

10:27 November 13

बंदला अमरावतीत हिंसक वळण, शांततेचे पालकमंत्र्यांचे आवाहन

अमरावती - त्रिपुरातील घटनेचे पडसाद कालपासून राज्यात उमटत असून आज अमरावती शहरात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जमावास पांगवण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत. भाजपाने बंदचे आवाहन केले होते, मात्र या बंदला हिंसक वळण लागले आहे. तर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शांतता पाळण्याचे आवाहन केले आहे. 

10:01 November 13

एसटी संपाबाबत शरद पवार-अनिल परब यांच्यात चर्चा

मुंबई -परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सिल्वर ओक येथे चर्चा झाली. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात महत्त्वाची चर्चा झाली. हा संप समन्वयाने सुवर्णमध्य काढत कसा मिटवता येईल, याविषयी चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. 

Last Updated : Nov 13, 2021, 4:20 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

big breaking

ABOUT THE AUTHOR

...view details