केरळमध्ये मुसळधार पावसामुळे मृतांचा आकडा 15 (कोट्टायम -12 आणि इडुक्की -3) अशी माहिती राज्याचा माहिती आणि जनसंपर्क विभागाने दिली आहे.
Big Breaking News : केरळमध्ये मुसळधार पाऊस, 15 जणांचा मृत्यू, बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू - ताज्या घडामोडी
14:16 October 17
केरळमध्ये मुसळधार पाऊस; 15 जणांचा मृत्यू
13:17 October 17
केरळमध्ये लष्कर, एनडीआरएफ आणि नौदलाकडून मदत व बचाव कार्य
केरळमध्ये लष्कर, एनडीआरएफ आणि नौदलाकडून मदत व बचाव कार्य सुरू आहे. भारतीय नौदलाने केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील भूस्खलन प्रभावित कुट्टिकल येथे मदत साहित्य सोडले आहे.
09:46 October 17
Big Breaking : भूस्खलनांच्या घटनांमध्ये 12 जण बेपत्ता
तिरुवनंतपुरम - केरळमध्ये शनिवारी धुव्वादार पावसाने हजेरी लागली होती. सर्वदूर झालेल्या पावसाने केरळमधील विविध नद्यांना पूर आले होते. या पुरात आणि विविध ठिकाणी झालेल्या भूस्खलनाच्या घटनेत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोट्टायम आणि इडुक्की जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनांच्या घटनांमध्ये 12 जण बेपत्ता झाले आहेत. लष्कर आणि एनडीआरएफच्या पथकांनी आज (रविवारी) सकाळी भूस्खलनात बेपत्ता झालेल्या नागरिकांची शोधमोहिम चालू केली आहे.