मुंबई -महाविकास आघाडी सरकारचे दुसरे अर्थसंकल्प सादर करण्यात आले. या अर्थसंकल्पात गॅसचा वापर कमी करण्यासाठी तसेच शहरातील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी, इलेक्ट्रिक वाहनांसाठी महामार्गावर मेगा इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग सेंटर उभारण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. त्यासाठी 2021-22या आर्थिक वर्षासाठी ऊर्जा विभागात 9 हजार 453 कोटी रुपये प्रस्तावित केले आहे.
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन -
केंद्र सरकारने 2030पर्यंत इलेक्ट्रिकल वाहने भारतात पूर्णत: उपयोगात आणण्याची योजना आखली आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिकरणामुळे दिवसागणिक रस्त्यावर वाढणारी वाहनांची संख्या, त्यातून निर्माण होणारे प्रदूषण आणि पर्यावरण हानी अशा समस्या निर्माण होत आहेत. त्यामूळे प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच गॅसचा वापर कमी करण्याकरिता केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. तसेच केंद्रीय अर्थसंकल्पाबरोबरच आता राज्याच्या अर्थसंकल्पातही इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.